(फोटो सौजन्य: X)
साप हा जंगलातला एक विषारी प्राणी आहे. आपल्या विषासाठी ओळखला जाणारा हा प्राणी त्याच्या एका दंशाने कुणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो, ज्यामुळे सर्वच त्याला घाबरून असतात. बहुधा जंगलात आढळून येणारा हा प्राणी मानव वस्तीत आल्यानंतर मात्र तहानेने व्याकुळ झाला. यानंतर तो पाण्याच्या शोधात लागला आणि तिथेच त्याला एक नळ सापडला. नळातलं पाणी पाहून साप इतका खुश झाला की त्याने थेट नळावरच उडी मारली आणि मग काय केले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक कोब्रा इतका तहानलेला दिसत आहे की तो नळावर चढला आणि नळातून पाणी पिऊ लागला. उष्णता आणि दुष्काळामुळे साप अनेकदा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतात. जवळपास पाणी नसताना या कोब्राने नळ निवडला असावा. नळावर चढत त्याने पाण्याच्या प्रवाहात आपलं शरीर ओलं करत छान आपली आंघोळ देखील आटोपली. पाण्याला पाहताच सापाला झालेला आनंद पाहून युजर्सही खुश झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. लोक कमेंट करत आहेत की त्यांनी सापांना दूध पिताना ऐकले होते, पण त्यांना पाणी पिताना पहिल्यांदाच पाहिले आहे.
कभी प्यासा सांप देखा है आपने नहीं देखा तो देखलो ना pic.twitter.com/9qozVSr3jQ
— Furqan Khan (@FurqanXpress) September 5, 2025
@FurqanXpress नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सापांसारखे धोकादायक प्राणी देखील पाण्याशिवाय त्रास सहन करतात हे दाखवले आहे. निसर्गातील प्रत्येक प्राण्याच्या स्वतःच्या गरजा असतात आणि उष्णता आणि दुष्काळाचा परिणाम सर्वांना होतो. हे पाहून लोक केवळ आश्चर्यचकित होत नाहीत तर प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे किती महत्त्वाचे आहे याचा विचार देखील करत आहेत. हा व्हिडिओ निसर्ग आणि प्राण्यांबद्दल संवेदनशील राहण्याचा संदेश देतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.