विराटा कोहलीचा (Virat Kohli) चाहता वर्ग प्रंचड मोठा आहे त्याच्या लाईफस्टाईल पासुन त्याच्या खाजगी गोष्टी पर्यत त्याच्या आवडी – निवडी गोष्टी चांहत्याना जाणून घ्यायला आवडता. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला असुन टी-20 विश्वकप (T20 WC 2022) खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या हॅाटेल रुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर त्याने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या आणि इतर खेळाडूंच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले आहे.