रशियन महिलेचे प्राणी संग्रहालात गोरीलासोबत धक्कादायक कृत्य; सोशल मीडियावर पेटला वाद, Video viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक गोरीला व्हेपमधून धूर ओढत असल्याचे दिसत आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांमध्ये विशेष करुन प्राणी प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामागचे धक्कादायक कारण म्हणजे एका रशियन महिलेने गोरीलाला व्हेप देऊन धूर उडवायला दिला आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिमियातील तायगन सफारी पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका रशियन व्यावसायिक बॉक्सरने गोरीलाला व्हेप दिली आहे. तिच्या या कृत्याने प्राणीप्रेमींमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या ४३ वर्षीय रशियन महिलेचे नाव अनास्तासिया लुचकिना आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ही महिला प्रथम स्वत:हा व्हेप ओढते आणि नंतर गोरीलाला देते. गोरीला देखील व्हेप ओढताना दिसत असून अनेकांनी याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पार्कचे पशुवैद्यक डॉ. वासिली पिस्कोवॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गोरीलाची प्रकृती खराब झाली होती. त्यांनी सांगितले की, तिने व्हेपमधील निकोटीन गिळल्याने तिच्या आतड्यांमध्ये गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय गोरिलाने त्यातील प्लास्टिक कॅप गिळली असण्याची शक्यात देखील आहे. यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया कारवी लागेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच गोरीला खूप लहान असल्याचे त्यांनी सांगितेल. यामुळे तिच्यासाठी व्हेप निकोटीन प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Russian boxer Anastasia Luchkina lets an endangered orangutan take a hit from her vape pen. The 24-year-old boxer is under fire after having the orangutan use her e-cigarette in Crimea. According to local outlets, the orangutan displayed “disturbing” behavior after consuming… pic.twitter.com/oRjhq59XLa — Collin Rugg (@CollinRugg) July 2, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या घटनेचा व्हिडिओ एक्सवर @CollinRugg या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या रशियन महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. प्राणी हक्क संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यामुळे गोरीलाचे प्राण जाण्याची भीती असून, महिलेविरोधात कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. सध्या या व्हिडिओमुळे रशियन महिलेवर तीव्र टीका केली जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.