Shocking Viral Video: नैसर्गिक आपत्तीत लहान-मोठे नुकसान होते. पण कधी कधी त्याचा वेग इतका असतो की मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टी नेस्तनाबूत होतात. असाच काहीसा प्रकार तुर्कियेमध्ये घडला. बुधवारी येथे आलेल्या वादळाने (Strom) मोठा विध्वंस केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही थक्क होईल. व्हायरल क्लिपमध्ये (Viral Video) एक सोफा हवेत उडताना दिसत आहे. ही घटना तुर्कीची राजधानी अंकारा इथे 17 मे रोजी घडली आहे.
गुरू ऑफ नथिंग (@GuruOfNothing69) या हँडलने ही व्हायरल क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – तुर्कस्तानमधील अंकारा इथे वादळाच्या वेळी हवेत उडणारा सोफा. अवघ्या 12 सेकंदांच्या या क्लिपच्या सुरुवातीला पक्षासारखी एखादी वस्तू आकाशात उडताना दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा झूम इन केला आणि तो सोफा असल्याचे समोर आले.
काही वेळ हवेत उडल्यानंतर मारल्यानंतर सोफा इमारतीला धडकून खाली पडला. व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. ही घटना पाहून काहींना आश्चर्य वाटत आहे, तर काहींनी गंमतीने त्याची तुलना रशियन क्षेपणस्त्राशी केली आहे. एका यूजरने टीका केली आहे की, 21 व्या शतकातील तुर्की: यापुढे फ्लाइंग कार्पेट नाहीत, आमच्याकडे फ्लाइंग सोफे आहेत. दुसर्याने लिहिले आहे की, मला वाटले ते सुपरसॉनिक रशियन क्षेपणास्त्र आहे.
हा पाहा व्हायरल व्हिडिओ
Multiple sofas flying during storm in Ankara, Turkey. pic.twitter.com/gWpzUuwDM8
— Guru of Nothing (@GuruOfNothing69) May 17, 2023
तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे 17 मे रोजी हे भयंकर वादळ आले होते, ज्यामुळे शहरात मोठा विध्वंस झाला होता. त्यानंतर अंकारा महानगरपालिकेचे महापौर मन्सूर यावस यांनी ट्विटद्वारे लोकांना जोरदार वारा आणि पावसाची माहिती दिली. तसेच त्यांना काळजी घेण्यास सांगितले. गार्डियनच्या वृत्तानुसार, येथे वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटरवर पोहोचला, त्यामुळे घराचं छत उडालं आहे. याशिवाय झाडेही उन्मळून पडली असून शहराचे मोठे नुकसान झाले आहे.