विद्या मंदीर आहे की कुस्तीचा आखाडा? भर वर्गात दोन शिक्षकांमध्ये जबरदस्त हाणामारी; एकमेकांची कॉलर धरली अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे पाहायला मिळत. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये स्टंट, भांडण, जुगाडांचे तर अनेक धक्कादायक असे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक भर वर्गात भांडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सारणगड-बिलाईगड येथील धाराशिव हायस्कूमधील आहे. यामध्ये दोन शिक्षकांची वर्गात विद्यार्थ्यांसमोर जबरदस्त भांडणे सुरु आहेत.असे म्हणतात आई-वडिलांनंतर शाळेतून आणि शिक्षकांकडूनच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते. शिक्षकच मुलांच्या आयुष्याला योग्य ती कलाटणी देतात, परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे लोकांनी असे शिक्षक आमच्या मुलांना काय ज्ञान देणार असे म्हटले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असतात. याच वेळी दुसरे शिक्षक येतात आणि वर्गात मागच्या बँचवर जाऊन बसतात. या वेळी शिकवत असलेले सर मागे जातात आणि दोन्ही शिक्षकांमध्ये काहीतरी चर्चा होते. अचानक दोन्ही शिक्षक एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी करु लागतात. याच वेळी आणखी एक शिक्षक त्यांची भांडणे सोडवण्यासाठी येतात. परंतु दोघेही एकमेकांना खाली जनिमीवर पाडलेल असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ उडतो. व्हिडिओ कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही शिकांमध्ये वेळापत्रकारवरुन आणि वर्गाची जबाबदारी घेण्यावरुन वाद घालत असतात. हा वाद इतका वाढतो की हाणामारी सुरु होते.लाथाबुक्यांनी दोन्ही शिक्षक एकमेकांना मारतात.
व्हायरल व्हिडिओ
सारंगढ़-बिलाईगढ़ के धारासीव हाई स्कूल में दो शिक्षकों के बीच हुई मारपीट ने शिक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। पढ़ाने को लेकर शुरू हुआ विवाद बच्चों के सामने लात-घूंसे तक पहुंच गया। डर के कारण छात्र कक्षा से भागते नजर आए। स्कूल बच्चों को सुरक्षा और शिक्षा देने का स्थान… pic.twitter.com/NmeR42rCMz
— Jaydas Manikpuri (@JayManikpuri2) September 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ छत्तीसगढमधील आहे. हा व्हिडिओ @JayManikpuri2 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अशा शाळेत पाठवण्यापेक्षा न पाठवलेले बरे असे अनेकांनी म्हटले आहे. तसेच असे शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देतील का असा प्रश्न सर्व करत आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.