(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला थक्क करण्याचे काम करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो लोकांचे होश उडवत आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन सापांचे मिलन होताना दिसून आले. हे अनोखे दृश्य फारच रंजक असून समोर उभा असलेला कुत्राही ते पाहून अवाक् झाला.
नागपूर येथील वाठोडा परिसरातील शैलेश नगर येथील दोन सापांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवली आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही साप एकमेकांभोवती विळखा घालत असल्याचे दिसून आले. व्हिडिओतील हे दृश्य पाहून अनेकांना ते नृत्य करत असल्याचे वाटून आले मात्र हे त्यांचे नैसर्गिक मिलन आहे. या प्रकारात साप परस्परांशी समागम करत असतात. स्थानिक वस्तीमध्ये दोन वन्य जीवांचे हे मिलन लोकांसाठी एक आकर्षणाचे कारण ठरले. एवढेच काय तर तिथे उभा असलेला कुत्रा देखील हे दृश्य पाहून अचंबित झाला आणि एक नजरेने हे सर्व दृश्य तो पाहत राहिला. लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात हे दृश्य कैद केले आणि मग सोशल मीडियावर शेअर केले.
Snake Mating Dance: A video of two snakes mating was captured in Shailesh Nagar, Wathoda, Nagpur, on Sunday, May 11. Locals were shocked to witness the rare sight in public view. Many recorded videos and shared them on social media platforms, where the footage quickly went viral. pic.twitter.com/1PiKg6bsZa
— nagpurnews (@nagpurnews3) May 11, 2025
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर होताच लोकांनी याला चांगला प्रतिसाद दाखवला आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. हा व्हायरल व्हिडिओ @nagpurnews3 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अजूनही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.