तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्..., VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Women Fight Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळले सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भन्नाट जुगाडाचे, तर कधी धोकादायक स्टंटचे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी लोकांच्या भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलीकडे लोक कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. कधी मेट्रोतमध्ये, तर कधी बसमध्ये सीटसाठी भांडणे होत असतात. यांचे व्हिडिओ देखील वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असतात. सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका साडीसाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी सुरु आहे.
सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त अनेक दुकानांमध्ये सेल सुरु आहेत. खास करुन साड्यांचे मोठ्या प्रमाणाच सेल सुरु आहेत. अशाच एक सेलमध्ये दोन महिलांमध्ये एका साडीवरुन वाद झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सेलमधील साड्या खरेदीसाठी बायकांची मोठी गर्दी जमली आहे. यामध्ये एका टेबलाजवळ अनेक महिला साड्या पाहताना दिसत आहे. याच वेळी अचानक मागून गोंधळ उडतो. तुम्ही पाहू शकता की, मागच्या बाजूला दोन महिलांमध्ये भांडण सुरु झाले आहे. दोघीही एकमेकांवर हल्ला चढवला आहे. एकमेकींचे केस ओढत एकमेकांनी ओरबाडत आहेत. एकीने दुसऱ्या महिलेची गचंडी धरत तिला खाली पाडले आहे. दावा केला जात आहे की, दोघींनाही एकच साडी आवडली होती, यावरुन दोघींमध्ये तुफान हाणामारी झाली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक सेक्युरिटी गार्ड देखील आहे, पण दोन्ही महिला काही ऐकण्याचे नाव घेईनात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Ladies over a Saree during Diwali Sale offer:
pic.twitter.com/OFriXoAOXb — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 22, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेत बायका कधीही, कुठेही भांडणे करु शकतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.