पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- @Vikas0207)
Viral Video: उत्तर प्रदेशमधून एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या महाराजगंज मधील असल्याचे समोर आले आहे. एक पोलीस अधिकारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमकावताना या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओत इन्स्पेक्टर कार्यकर्त्यांना दोन मिनिटात तुम्हाला सरळ करेन असे म्हणताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमकावताना पाहायला मिळत आहे. पोलीस अधिकारी त्या कार्यकर्त्यांना म्हणतो, “मला नोकरीची पर्वा नाही. तुमच्या सर्वांचे डोकं खराब झाले आहे. तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी २ मिनिटे लागतील.” ही पूर्ण घटना श्रीमद भागवत कथेसाठी वर्गणी मागण्यावरून झाल्याचे म्हटले जात आहे.
ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगितले जात आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते बिसोखोर गावात वर्गणी गोळा करत होते. मात्र काही ठिकाणी लोकांनी वर्गणी देण्यास नकार दिला आणि हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.
"नौकरी की ऐसी की तैसी करता हूं मैं"
"अभी इस्तीफा देकर यहां से चला जाऊंगा"महराजगंज में इंस्पेक्टर साहब इतना ज्यादा परेशान हो गए कि नौकरी की ही ऐसी की तैसी कर दी. इनके सामने बजरंग दल के कार्यकर्ता थे. कार्यकर्ताओं का भी 'टशन' कम नहीं था. उनकी आपत्ति इस बात पर थी कि कार्यकर्ता का… pic.twitter.com/iJNVNl5VeV
— 𝐕𝐢𝐤𝐚𝐬 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 (@Vikas0207) August 27, 2025
पोलीस ठाण्यात गोंधळ
त्यानंतर बजरंग दलाने पोलीस ठाण्यात जाऊन निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यावर काही भाष्य केले. पोलीस अधिकाऱ्याने एका कार्यकर्त्याचा मोबाईल काढून घेतला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. ज्यामध्ये एका वरील घटनेचे पुरावे होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने देखील स्वतःवरील ताबा सोडला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मला नोकरीची पर्वा नाही. तुमच्या सर्वांचे डोकं खराब झाले आहे. तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी २ मिनिटे लागतील, असे म्हणत आहे.
अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने श्वानाला बाईकला बांधले आणि फरपटत नेले आहे. ही घटना अहमदाबामध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. याचा घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्राणी प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांनी संबंधित व्यक्तीवर करावाईची मागणी केली आहे. सांगितले जात आहे की, या व्यक्तीने आधी श्वानाला बेदम मारहाण केली होती. नंतर त्याला बाईकला बांधले आणि गावभर फरपटत नेले. त्यानंतर व्यक्तीने त्याला पूलाखाली सोडून दिले.
अहमदाबाद में एक शख्स ने कुत्ते के साथ ऐसा सलूक किया की मानवता भी शर्मा जाए. pic.twitter.com/YPaQxtIFwH
— Hemraj Singh Chauhan (@JournoHemraj) August 24, 2025
सध्या त्याचा श्वानाला बाईकवरुन फरपटत नेत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे प्राणी प्रेमींमध्ये विशेष करुन संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर न्यायालयीन कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.