(फोटो सौजन्य: X)
अलीकडेच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वत्र धुमाकूळ उडवून दिला आहे. यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना त्यांच्या पत्नीने सर्वांसमोर थप्पड मारल्याचे दिसून आले. वास्तविक, मॅक्रॉन त्यांच्या पत्नीसह व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडून आली जो इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला. फ्रांसचे राष्ट्रपतींची पत्नीचा मार खातात यावर लोकांना अजब वाटले. ही घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि मग एलिसी पॅलेसला या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे लागले. चला या या व्हिडिओमागील सत्य आणि घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई लोकलमध्ये महिलांची केसांवरुन शाब्दिक बाचाबाची ; वाद विकोपाला गेला अन्…, Video Viral
काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट हनोईमध्ये विमानातून उतरताना दिसत आहेत. दरम्यान, ब्रिजिट मॅक्रॉन बाहेर येत असतो आणि यावेळीच त्याची पत्नी त्याच्या बाजूला असते. सर्वकाही ठीक असतानाच अचानक त्याची त्याच्या कानशिलात हाणते. हे सर्व दृश्य समोरील कॅमेरात कैद होत आणि मग याला सोशल मीडियावर शेअर केलं जात. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन याने निस्तब्ध होतात मात्र पुढच्याच क्षणी ते स्वागत करणाऱ्या शिष्टमंडळाकडे हात हलवताना जणू काही घडलंच नाही असे भासवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावेळी खाली पत्रकारांची गर्दी आहे आणि कॅमेरे त्याच्यावर केंद्रित असल्याचे जाणवते ज्यानंतर ते दोघेही एकत्र खाली उतरतात मात्र काही सेकंदाच्या त्या कृतीने सर्वांचे लक्ष केंद्रित केले.
❗️ Macron’s wife viciously SMACKS him in face pic.twitter.com/2zSalRFYLu
— RT (@RT_com) May 26, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, फ्रेंच सरकारने तो फेटाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला, एलिसी पॅलेसने दावा केला होता की हा व्हिडिओ एआय वापरून तयार करण्यात आला होता आणि तो बनावट होता. तथापि, व्हिडिओची सत्यता पुष्टी झाल्यानंतर राष्ट्रपती भवनाची भूमिका नंतर बदलली. मॅक्रॉनच्या एका जवळच्या सहकाऱ्याने याला “पती-पत्नीमधील विनोद” असे वर्णन केले. फ्रेंच माध्यमांनीही असेच वृत्त दिले. जगभर मात्र या व्हिडिओकडे गांभीर्याने पाहिलं गेलं, अनेकांनी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असावं असा अवमान लावला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.