(फोटो सौजन्य – X)
हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक या भागात येतात आणि फ्लेमिंगो आणि सीगलचे हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करतात. हे पक्षी बहुतेक गुजरातमधील कच्छ आणि राजस्थानमधील सांभर तलावातून येतात. त्यापैकी काही पक्षी मध्य पूर्व, इराक आणि अगदी आफ्रिकेतून प्रवास करतात असे मानले जाते. पक्ष्यांचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी नवी मुंबईतील अनेक पर्यटक त्यांच्या गुलाबी रंगाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. ते सहसा नोव्हेंबर महिन्यात येतात परंतु यावर्षी उष्ण हवामानामुळे त्यांच्या वार्षिक भेटीला उशीर झाल्याचे दिसून येते.
#WATCH | Maharashtra: A large number of migratory flamingos, seagulls and other birds have arrived at the creek in Karave village in Navi Mumbai pic.twitter.com/9IAR9algzg — ANI (@ANI) January 8, 2025
Flamingos,Navi Mumbai,Flamingo season,Wildlife India,Bird migration,Pink wetlands,Nature photography,Allycaral,Mumbai wetlands,Urban wildlife,Pratik543,India nature sights pic.twitter.com/D08omSIaUn — Allycaral (@allycaralgoa) December 8, 2025
एएनआयने एक्स वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, हजारो गुलाबी फ्लेमिंगो पक्षी एकत्र जमल्याचे दिसून येते. हे अद्भूत दृश्य तुम्हाला इतर सीजनमध्ये नाही तर फक्त हिवाळ्यातच पाहता येऊ शकते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘नवी मुंबईतील करावे गावातील खाडीत मोठ्या संख्येने स्थलांतरित फ्लेमिंगो, सीगल आणि इतर पक्षी आले आहेत’. नवी मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी शिवडी मॅन्ग्रोव्ह पार्क, नेरुळमधील तवले वेटलँड्स, भांडुप पंपिंग स्टेशन, माहुल क्रीक आणि टीएस चाणक्य बर्डिंग पॉइंट लोकप्रिय आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






