(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मंत्री उत्साहात फुटबॉल हवेत उडवण्यासाठी सज्ज होताना दिसतात. यावेळी इतर मंडळीही त्यांचा हा खेळ पाहणायसाठी उत्सुक असतात पण क्षणातच सर्वांच्या उत्साहावर विरजण पडते आणि हास्यास्पद घटना घडून येते. मंत्री फुटबॉलला आपल्या समोर ठेवून त्याला पायाने किक मारायला जातात पण तितक्यातच त्यांचा तोल ढासळतो आणि ते खाली पडतात. हा प्रकार इतका विनोदी असतो की उपस्थित सर्व मंडळींना हसू अनावर होते. इतकेच काय तर मंत्रीही यावर हसू लागतात. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून युजर्सनेही या दृश्यांची पुरेपूर मजा लुटली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @nd24_news नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिब्रुगडमधील चौकीडिंगी क्रीडांगणावर फुटबॉल खेळत असताना मंत्री प्रशांत फुकन घसरून पडले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “साहेब, पुढच्या वेळी आम्हाला रोनाल्डोच्या स्टाईलचा सायकल-किक हवा आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निदान या वयात तरी त्याने प्रयत्न केला, उत्तम खेळाडू वृत्ती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






