काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ज्यूस विक्रेता उसाच्या रसासोबत चक्क आईस्क्रिम कोन टाकताना दिसत आहे. हा विक्रेता दोन आईस्क्रिमचे कोन काढून उसाच्या गुऱ्हाळ्यात टाकतो. यानंतर मशीनमधून उसाचा रस आणि विरघळलेली आईस्क्रिम बाहेर येते. धक्कादायक बाब म्हणजे या विक्रेत्याने आईस्क्रिम रॅपर सकट तसेच टाकले आहे. हा अतरंगी प्रकार पाहून नेचकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच तिथे उपस्थित लोकही चक्रावले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
Tf i just watched 😭 pic.twitter.com/aQ5cVEhyI5 — rareindianclips (@rareindianclips) May 4, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rareindianclips या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी या अतरंगी एक्सपिरिमेंटची चांगलीच फिरकी घेतली आहे. भारतात टॅलेट आणि मुर्खपणा या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अरे उसाचा रस तरी सोडा असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने हे पाहण्या आधी माझे डोळे का गेले नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
हाय गर्मी! कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांसाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






