(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तराखंडाच्या खाटीमा शहरातून समोर येत आहे. यानुसार स्कुटीवरुन जाणाऱ्या महिलेची रस्त्यावर अचानक एका हत्तीला जोरदार धडक बसते ज्यानंतर ती हत्तीचे दात तुटुन जमिनीवर पडतात. या दुर्घटनेत महिलेलीही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिला ही व्यावसायाने एक शिक्षिका असल्याची माहिती आहे. घटना दु:खद असली तरी इंटरनेटवर मात्र याचे हसू उडवले जात आहे. आता तर हत्ती देखील सेफ नाही आहे अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.
दरम्यान उत्तराखंडातील US नगरमध्ये महिला जंगलातील वाटेतून जात होती. या दरम्यान बनबसा-चकरपूर दरम्यानच्या घनदाट जंगलातून एक हत्ती अचानक रोडवर आला. हत्ती अचानक महिलेच्या वाटेत आला ज्यामुळे तिला स्कूटीला कंट्रोल करता आले नाही आणि ब्रेकही मारता आला नाही. परिणामी हत्ती आणि महिला दोघेही गंभीररित्या जखमी झाले तर या धडकेत हत्तीचे दात देखील तुटले.
एक ऐसा एक्सीडेंट जिससे लोग आश्चर्यचकित हो रहे हैं और हस 🤣 भी रहे है एक स्कूटी सवार शिक्षिका सड़क पार कर रहे हाथी से टकरा गई इस टक्कर से हाथी का दांत टूट कर गिर गया। शिक्षिका और उसकी स्कूटी सड़क पर गिर गई ,
गुजर रहे लोगों ने शोर मचाया तो हाथी जंगल वापस चला गया ये एक्सीडेंट… pic.twitter.com/a7rVO3UNlu — Shailesh Verma (@shaileshvermasp) May 20, 2026
अशा घटनेनंतर अधिकतवेळी हत्ती आक्रमक होतात पण इथे असं काही झालं नाही. रस्त्यावरील लोकांनी वेळीच आरडा-ओरड केली ज्यामुळे घाबरुन हत्ती जंगलात निघून गेला. व्हिडिओत महिला आणि प्राणी दोघांचे नुकसान झाले, त्यांना गंभीर दुखापत झाली पण सोशल मिडियावर मात्र यूजर्स या घटनेची खिल्ली उडवत मस्करी करताना दिसले. दरम्यान, या अपघातामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसोबतच रस्त्यावर वाहन चालवताना सतर्क राहण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






