(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गार्ड एटीएमजवळ बसून देखरेख करत असतो. यावेळी अचानक एटीएमचा दरवाजा उघडतो. क्षणार्धात एक सिंह खोलीत प्रवेश करतो. सिंहाला पाहून गार्ड घाबरतो. तो उठण्याचा प्रयत्न करतो, पण भीतीने तोल जातो. काय घडत आहे हे समजण्याआधीच सिंह गार्डला खेचत तिथून घेऊन जातो. व्हिडिओमध्ये पुढे सिंह एटीएम रूममधून गार्डला ओढून बाहेर काढताना दिसतो. बिचारा गार्ड धडपडतो, पण सिंहाला दया येत नाही. गार्ड ओरडतो आणि व्हिडिओ क्षणार्धात संपतो. आता हा व्हिडिओ खरा की खोटा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून काहींनी यातील दृश्ये एआय-जनरेटेड असल्याचा दावा केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @ch76891 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भयानक दृश्ये. एटीएममध्ये बसलेल्या सुरक्षा रक्षकावर सिंहाने हल्ला केला, त्याने त्याला ओढत नेले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप भयानक आहे भाऊ, हा व्हिडिओ कुठला आहे?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण व्हिडिओ बनावट आहे. जर सिंह आला तर तो वाघ पाहील. त्याच्याशी खेळणे थांबवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






