ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर अनेक तरुण वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवत आहेत. रस्त्यावर ट्रक, चारचाकीगाड्या आणि काही इतर दुचाकीस्वारही आहेत. हे तरुण वेड्यावाकड्या पद्धतीने बाईक चालवत आहे. यातील एक तरुण बाईक चालवत असताना कट मारलायला जातो. परंतु यामुळे त्याच्या मागाच्या बाईक वाल्याला धडक बसते. धडक बसल्याने त्याचा तोल जातो आणि हवेत उडून जमिनीवर आदळतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जमिनीवर आदळल्यानंतर तरुण गोलगोल फिरत झुडपांमध्ये जाऊन पडला आहे. तसेच बाईक देखील फरपटत गेली आहे. मातीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. सुदैवाने कोणताही मोठा भीषण अपघात झालेला नाही. परंतु दुचाकीस्वाराचे नुकसान झाले आहे. शिवाय स्टंटबाजीमुळे रस्त्यावर जाणाऱ्या इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओ
बाइक कैसे चलाते हैं देखो.. 🚳🚲 ऐसे लोगों के बारे में आप क्या कहोगे?🤔🥹 pic.twitter.com/sSQL6ozp9o — Prisha (@pki42) January 18, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काही तासांपूर्वी देखील असाच एक तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना आताच्या पिढीला काय झाले आहे असे म्हटले आहे. तसेच अशा पोरांना पालक बाईक देताच कसे असे म्हटले आहे. काहींनी रिलसाठी हा सर्व प्रकार सुरु असून यांच्यामुळे बाकिचे देखील धोक्यात येतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






