फोटो सौजन्य: iStock
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. आत्तापर्यंत तुम्ही माणसांच्या भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील पण तुम्ही कधी प्राण्यांचे हल्ला करण्याचे व्हिडीओ पाहिले आहेत का? या संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका जिराफावर सिंहांच्या टोळीने हल्ला केला होता. पण जिराफने त्या सिंहांना असा धडा शिकवला की त्यांनी त्याची शिकार करण्याचा विचारच सोडून दिला.
सिंह हा जंगलाचा राजा आहे. मोठे प्राणीही सिंहापुढे शरण जातात. पण असाच काहीसा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे. जो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक सिंहांनी एका जिराफावर हल्ला केला होता. सिंहाची शिकार त्याच्या हतातून सुटू शकत नाही असे म्हटले जाते, मात्र या व्हिडिओमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.
एकाट्या जिराफाची सिंहांच्या कळपावर मात
सिंहांचा एक संपूर्ण कळप जिराफावर हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पॅकमध्ये एक-दोन नव्हे तर अर्धा डझन सिंहांचा समावेश होता, तरीही ते त्यांच्या शिकाराला मारू शकले नाहीत. एक एक सिंह जिराफावर एका मागून एक जिराफला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येकजण जिराफाला खाली आणण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतो, परंतु जिराफ सगळ्यांना एका लाथेत झटकून पाडतो. खाली सिंह त्याच्या पायला चावून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र जिराफ प्रत्येक सिंहाला पूर्ण ताकदीने लाथ मारताना दिसतो. वारंवार मार खाल्ल्यानंतर सिंह शेवटी हिंमत गमावतात आणि जिराफला जाऊ देतात. त्यांचा पराभव केल्यावर जिराफ त्याच्या वाटेला जातो.
व्हायरल व्हिडीओ
King Fu Giraffe
pic.twitter.com/dH5EKLGDJS— Science girl (@gunsnrosesgirl3) August 10, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहे. @gunsnrosesgirl3 नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ६४ हजार लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘एका जिराफने अनेक सिंहांवर मात केली.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘जिराफची लाथ खूप मजबूत आहे, म्हणूनच या सिंहांनी शिकार करण्याचा विचार सोडला.’ आणखी एका युजरने म्हणले आहे की, ‘सिंह क्वचितच जिराफांवर हल्ला करतात कारण शिकार करताना सिंह प्राण्यांचा गळा पकडून त्याचा गुदमरून खून करतात आणि नंतर ते आरामात खात राहतात, परंतु त्यांची ही युक्ती जिराफांवर काम करत नाही.