देव तारी त्याला कोण मारी! चिमुकल्याच्या अंगावर SUV कार गेली अन् पुढच्या क्षणी...; भयावह घटनेचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच अनेक भयावह अपघातांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. सध्या एका चिमुकल्याच्या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकला खेळता खेळता गाडी खाली आला आहे, सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या नवसारी येथे ही भयावह घटना घडली आहे. एक तीन वर्षाचा चिमुकला गाडी खाली आला होता. पण असा चमत्कार झाला की, चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली, पण या भयावह अपघातातून तो सुखरुप बचावला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका एसयूव्ही फॉर्च्युनरने चिमुकल्याला धडक दिली होती. मंगळवारी (२४ जून) ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली.
चिमुकला घराबाहेर खेळत होता. यावेळी चिमुकल्याचा बॉल रस्त्यावर गेला. चिमुकला त्या बॉलच्या मागेल धावला. याच वेळी दुसऱ्या बाजूने एक चारचाकी गाडी येते होती. कारचालकाला चिमुकला दिसला नाही. यामुळे त्याच्याकडून चिमुकल्याच्या अंगावर गाडी गेली. चिमुकला गाडी खाली आला जोरात डोक्यावर आदळला आणि मोठ्याने रडू लागला. इतक्यात घरातून चिमुकल्याची आई त्याचा रडण्याचा आवाज ऐकून बाहेर आली आणि आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच ती कारचालकावर जोराजोरात ओरडत देखील होती.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
गुजरात के नवसारी से आया दिल दहला देने वाला वीडियो
◆ फॉर्च्यूनर के नीचे आ गया छोटा बच्चा, किस्मत से बची जान
◆ यह पूरी घटना बच्चे के घर लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई #Gujarat #Navsari pic.twitter.com/7q23Rs4G1r
— Kaushik Kanthecha (@Kaushikdd) June 28, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्सवर @Kaushikdd या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आईने आपले मुलं गाडीच्या खाली अडकेलेल बघितल्यावर कारचालकाला थांबवले, त्याला पुढे जाऊ दिले नाही आणि हळूच आपल्या चिमुकल्याला बाहेर काढले. या भयावह घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.