म्हारी छोरी छोरे से कम हे के? खांद्यावर बॅग अन् डोक्यावर सिलेंडर घेऊन 'ती'चा प्रवास ; VIDEO पाहून मन हेलावेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शाळकरी मुलगी डोक्यावर गॅसचा सिंडेलर घेऊन शाळेतून घरी परतताना दिसत आहे. एका खांद्यावर शिक्षणाचे ओझे तर दुसऱ्या खांद्यावर कुटचुंबाची जबाबादारी उत्तमपणे संभाळताना ही मुलगी दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या अनेक नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. पण हा व्हिडिओ केवळ जबाबदारी किंवा संघर्षाचा प्रत्यय आणत नाही. तर एक स्त्री आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, त्याच्या उदरनिर्वाहासाठी कठीणातल्या कठीण परिस्थिती कशी ठामपणे राहू शकते हे कळते. एक स्त्री केवळ अन्नपुर्णा म्हणून नव्हे, तर एक शक्तीस्तंभ, आधार आणि धैर्याची मूर्ती बनून खंबीरपणे उभी राहते. कर्तव्य, शिक्षण आणि स्वप्नं याचे यांचा उत्तम समतोल राखू शकते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या कुटुंबाचा आधार बनते.
Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
जिनको कंधो मे जिम्मेदारी होता है सब मोहमाया खत्म हो जाता है चाहे लड़का हो या लड़की सबको अपना अपना घर का जिमेदारी निभाना पड़ता है pic.twitter.com/br3y0bgYZx — dineshwar patel (@dineshwar_0673) December 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dineshwar_0673 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओतील शाळकरी मुलीचे कौतुक होत आहे. यावर एका युजरने जबाबदारी वय पाहत नाही, अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एकाने म्हारी छोरी छोरोंसे कम हे के अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर तिसऱ्या एकाने सरकारला जबाबदार धरत याला म्हणतात अव्यवस्था, भ्रष्टाचार असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






