साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशाच्या हापूडमध्ये घडली आहे. एक मद्यधुंद तरुणाने रिकामी पोलिस चौकी पाहून थेट स्वत:लाच तिथला ठाणेदार बनवले आहे. इन्स्पेक्टरची टोपी घालून खुर्चीवर बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पोलिस ठाण्यात बसला आहे. त्याने डोक्यावर इन्स्पेक्टरची टोपी घातली असून समोर असलेल्या फाइल्स तपासण्याचा रुबाब झाडत आहे. तरुण पूर्णपणे नशेत धूत होऊन चौकीत बसला आहे. सिंघम स्टाइलमध्ये सरकारी कागदपत्रे चाळत आहेत. हा सगळा प्रकार एका स्थानिक नागरिकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही क्षणातच हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल झाला.
हापुड़ में चौकी खाली…शराबी बना थानेदार, कुर्सी संभालकर करने लगा थानेदारी देहात कोतवाली क्षेत्र के अंतर्गत दोयमी पुलिस चौकी का मामला pic.twitter.com/soMF1QW9SO — Gaurav Kumar (@gaurav1307kumar) July 18, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gaurav1307kumar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी याची फिरकी घेतली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, साहेब आमची पण तक्रार घ्या अशी मजेत कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्या पोलिस चौकी सोडून कुठे गेले असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मज्जा लुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने पोलिस चौकीच्या आत चांगलाच राडा घातला होता. त्याने स्वत:ला आत कोंडून घेतले होते. अनेक महत्त्वाचे सरकारी कागरपत्रे फाडली, खिडकीच्या काचा तोडल्या. यावेळी पोलिस कर्मचारी बुंदेलशहर येथे एका व्हीव्हीआयपी ड्युटीसाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे चौकीत कोणी नसल्याचा फायद्या या नशेत धुत तरुणाने घेतला. व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






