(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात, कधी विचित्र जुगाड तर कधी अपघाताचे दृश्ये… अशातच आता इथे एक मजेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो तुमचे होश उडवेल. जसजसे आपले वय वाढू लागते, आपले आरोग्यही बिघडू लागते ज्यामुळे अनेक वयोवृद्धांना शरीराची जास्त हालचाल करता येत नाही. मात्र आताच्या व्हिडिओमध्ये एका आजीने असेकाही करून दाखवले आहे जे पाहून तरुणाईही त्यांच्या धाडसाला लाजेल. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एका धोकादायक राइडची मजा लुटताना दिसून येतात. अनेक वाॅटर पार्क्समध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक वाॅटर थीम खेळ किंवा राइड्स ठेवले जातात. मात्र यांमध्ये जाण्याची हिम्मत प्रत्येकामध्ये नसते. व्हायरल व्हिडिओमध्ये आजी देखील अशाच एका भीतीदायक राइडची मजा लुटताना दिसून आली. तिचा हा उत्सव इतका जबरदस्त होता की पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. व्हिडिओमध्ये आजी एका कॅप्सूलसारख्या दिसणाऱ्या राइडमध्ये जाऊन उभी राहते, त्यानंतर त्याचा दरवाजा बंद होतो आणि हवेच्या वेगात हे कॅप्सूल पाइपमधून वेगाने खाली पुलच्या दिशेने जाऊ लागते. सहज सोपी वाटणारी ही गोष्ट वाटते की सोपी नाही. मुळातच यांची उंची आणि वेग पाहूनच अनेकांना धडकी भरते आणि अशातच आजींनी धाडस करून या राइडचा घेतलेला अनुभव आता अनेकांच्या पसंतीस पडला आहे. लोक आजींच्या या धाडसाला प्रेरणादायी म्हणत आहेत.
आज्जींचा हा व्हायरल व्हिडिओ @sachin_prajapat_yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतके संघर्ष पहिले असतील आज्जीने की हा तिच्यासाठी केकचा तुकडा असावा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती माझी मावशी आहे. ती दररोज सुदर्शन क्रिया आणि ध्यान करते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, आजी तुम्ही तर ग्रेट आहात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.