(फोटो सौजन्य: X)
पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ
काय आहे प्रकरण?
असं म्हणतात, कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा नात्यातील प्रेम देखील कमी होते. आजच्या काळात एक्ट्रा मॅरिटल अफेरच्या घटनांमध्ये खूप जास्त वाढल्या आहेत. अशा काही घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच एक नवीन घटना इथे शेअर करण्यात आली आहे ज्यात पती आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावताना दिसून आला. ही घटना नक्की कुठे घडली आहे याची माहिती व्हिडिओत देण्यात आली नाही पण व्हिडिओमध्ये घटनेचे संपूर्ण दृष्य आपल्याला पाहता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पती आपल्या ३६ वर्षीय पत्नीला एका २४ वर्षीय तरुणासोबत रंगेहात पकडतो. दोघांना एकत्र पाहून त्याला राग येतो पण यानंतर तो एक धक्कादायक निर्णय घेतो. सांगितले जात आहे की, तरुणाचे बऱ्याच काळापासून महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पतीने दोघांना एकत्र पाहताच ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि लोक जमा झाली. आता काय करायचे या प्रश्वावर अखेर लग्न हे उत्तर निश्चित करण्यात आले. व्हिडिओमध्ये जमावासमोर महिला आणि तरुण एकमेकांना हार घालताना दिसून येतात. दरम्यान या सोहळ्यावेळी दोघेही फार खुश दिसत नाही ज्यावरुन त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाल्याचे वर्तवले जाऊ शकते.
Extra-Marital affair Kalesh (Husband Caught his 36y/o wife with 24y/o guy in compromising position, who then forced the two to marry each other) 🫡 pic.twitter.com/QVGjHPo2Ld — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 14, 2026
घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘विवाहबाह्य संबंधांमुळे झालेला राडा (पतीला त्याची ३६ वर्षीय पत्नी एका २४ वर्षीय तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली; त्यानंतर त्याने त्या दोघांना एकमेकांशी लग्न करण्यास भाग पाडले) ‘. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “नवऱ्याने तर घटस्फोटाची प्रक्रिया एकदम ‘स्पीड-रन’ केली. आपल्या सर्व जबाबदाऱ्या थेट त्या २४ वर्षांच्या तरुणीकडे ‘RTGS’ (हस्तांतरित) करून टाकल्या. भारीच माणूस आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, त्याने आपली समस्या थेट त्या माणसाकडे सोपवली” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बरोबर केलंस. आता त्या मुलालाही थोडी जबाबदारी घेऊ दे. त्याला फक्त मजा करायची होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






