पोलीस ठरला देवदूत! धावत्या ट्रेनखाली आलेल्या तरुणीचे वाचवले प्राण; नेटकऱ्यांकडून कौतुक Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट )
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे अपघातांचे अनेक थरराक असे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक मुंबईच्या भोपाळ रेल्वे स्टेशनवरील एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई लोक ही मुंबईतील लोकांच्या जीवनाचा अविभ्याज्य भाग बनली आहे. यामधून दररोज लाखो लोक प्रवास करतात.रोज सकाळी लोकमध्ये कामाच्या घाईत धक्काबुक्कीत करतच जाणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अनेकदा कामावर लवकर पोहोचण्याच्या विचाराने लोक धावत्या ट्रेनमध्ये चढतात. यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या मुलीसोबत असेच काही घडले आहे. तिची धावत्या ट्रेनमध्ये चढण्याची एक चूक तिला चांगली महागांत पडली आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या सावधगिरीने तरुणीचे प्राण वाचले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेन पकडण्यासाठी धावत आहे. ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्मवर येत असून धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तरुणी प्रयत्व करत आहे. याच वेळी अचानक तिचा पाय घसरतो आणि ती ट्रेन खाली जाते. यामुळे तिचा मोठा अपघात झाला असता. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी तातडीने तिला वर खेचून घेतात. यामुळे तिचे प्राण वाचतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जीआरपी के आरक्षक गोविन्द सिंह चौहान ने 14 वर्षीय बालिका की जान बचाई,अशोकनगर रेलवे स्टेशन पर होने से बचा हादसा। ऐसी घटना से यह भी सबक लें कि चलती ट्रेन में चढ़ने का प्रयास न करें। pic.twitter.com/LNJA8wPvAS
— Nitendra Sharma (@nitendrasharma2) March 29, 2025
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nitendrasharma2 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. अनेकांनी अशा घटा रोजच घडत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “अशोकनगर रेल्वे स्थानकावर जीआरपी कॉन्स्टेबल गोविंद सिंह चौहान यांनी 14 वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले, अपघात टळला. अशा घटनेतून हेही शिका की चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका.” असे लिहिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, अगं ताई इतकी घाई कशाला करायची तर दुसऱ्या एकाने पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक करत, दादा तुम्हाला सलाम असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.