फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जो पाहून आश्चर्य वाटते. तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट, कधी भांडण तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स रिल्स सतत व्हायरल होत असतात. याशिवाय वन्यजीवांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक अद्धभुत व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. असा नजारा क्तचितच पाहायला मिळतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका पेलिकन पक्ष्याचा आहे. व्हिडिओमध्ये हा पक्षी चतुराईने त्याच्या पुढे उडणाऱ्या पक्ष्यापासून आपले शिकार कसे हिसकावून घेतो याचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
पक्ष्यांची शिकारीसाठी अनोखी झुंज
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हा पाहू शकता की, एक पक्षी आकाशात मासा पकडून उडत आहे. तितक्यात अचानक दुसरा पेलिकन नावाच पक्षी तिथे येतो आणि त्याची शिकार घेऊन जातो. त्याच वेळी आणखी एक पक्षी त्या पक्ष्यावर हल्ला करणाच असतो पण तो पक्षी आपली शिकार सोडून देऊन पुढे निघून जातो. हे अद्भुत दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ फोटोग्राफर मार्क स्मिथने कैद केलेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ मार्क स्मिथने त्याच्या इन्स्टाग्राम mark.smith.photography अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे, अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील सोशल मीडियावर मांडल्या आहेत. अनेकांनी मार्कचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, नेहमीप्रमाणेच अतुलनीय काम, तर दुसऱ्या एकाने, तुम्हाला हे सर्व अविश्वसनीय व्हिडिओ कसे मिळतात? असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मी अवाक् आहे, हे आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.