सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज हास्याने भरलेले असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका निष्पाप चिमुकल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची अशी उत्तरे दिली आहे की हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चिमुकल्याने नक्की प्रश्नांचे काय उत्तर दिले ते जाणून घेऊयात.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये तुम्हाला स्टेजवर काही मुले जमलेले दिसतील. यावेळी त्यांच्यासोबत एक अँकरदेखील आहे जो त्या चिमुकल्यांना काही प्रश्न विचारत आहे. या स्टेजसमोर हजारोच्या संख्येने प्रेक्षक बसलेले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अँकर एका चिमुकल्याला काही प्रश्न विचारतो त्यावर चिमुकला त्याला असे काही भन्नाट उत्तरे देतो की ते ऐकून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आता पोट धरून हसत आहेत. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हेदेखील वाचा – हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला हाथ लावाल, Video Viral
अँकर – तुझं लग्न झाल आहे का?
चिमुकला – नाही
अँकर – मम्मी पप्पांच
चिमुकला – हो
अँकर – तु होता का लग्नाला
चिमुकला – नव्हतो
अँकर – कुठे गेला होता
चिमुकला -पोटात
अँकर – घरी कोण कोण असतं?
चिमुकला – आई, पप्पा, आज्जी, आबा आणि बापू
अँकर – तुझी बायको कुठे असते?
चिमुकला – शाळेत
हेदेखील वाचा – चिमुकलीने सापाला दाखवला इंगा, ओढून बाहेर काढले अन्… मुलीचे धाडस पाहून आवाक् व्हाल, पाहा Viral Video
हा व्हायरल व्हिडिओ @actor_om_yadav_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,मुले म्हणजे देवाघरची फुले असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आताची लहान मुले म्हणजे निळू फुले ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हुशार आहे कारट….” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगदी बरोबर उत्तर दिली बाबूने ”.