फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी स्टंट, तर कधी जुगाड, कधी भांडण तर डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण स्टंट करायला गेला आणि तोंडावर आदळला आहे. हा व्हिडओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून हजारो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण स्केटिंग करत आहे. तर तिथेच एक मुलगी सायकल चालवताना दिसत आहे. तसेच रस्ता संपूर्ण मोकळा असून रस्त्यावर दोन मुले बसलेली दिसत आहेत. स्केटिंग करणारा तरूण वाऱ्याच्या वेगाने स्केटिंग करत येतो आणि मुलीच्या सायकलवर बसतो. सायकल चालवत असताना मुलगी मागे वळून पाहते आणि मुलाला पाहून घाबरते. आणि सायकल चालवताना अचानक तीचा तोल जातो. बाजूलाच एक नदी असते. ती सायकलवरून उडी मारून सायकल तशीच त्या नदीच्या दिशेने सोडून देते. तो मुलगा पुढे असलेल्या एका झाडाला धडकतो आणि खाली आदळतो.
हे देखील वाचा- सावधान! रेल्वेमध्ये भेळ खाताय? मग हा व्हिडिओ पाहाच; पुन्हा खाताना 100 वेळा विचार कराल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jgm_skating_lover या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मुलीने चांगलाच इंगा दाखवला, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय गरज होती मागे बसायची, बिचारीला घाबरवले ना. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ताई बरोबर केलेस तु. आणखी एका युजरने म्हटले आहे की, ताईसाठी एक लाईक तर करावाच. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.