महिलेने पकडला ॲमेझॉन नदीत आढळणारा अरापायमा मासा
दुनियेत अनेकजण आहेत ज्यांना मासे पकडायला खूप आवडतात. मासेप्रेमी त्यांच्या मासेमारी दांड्यांसह नदी किंवा तलावाच्या काठावर जाऊन आणि तासनतास माशांची वाट पाहत बसतात. मासे पकडून घरी येऊन शिजवून खाता. पण अनेकदा छोटे मासे हाती लागतात. काही वेळा तर एकही मासा पकडला जात नाही. परंतु कधीकधी नशीब चमकते आणि कोणीतरी मोठा मासा देखील पकडतो. असाच काहीसा प्रकार या महिलेसोबत घडला आहे. तिने एवढा मोठा मासा पकडला की तिला तो मासा खांद्यावर घ्यावा लागला. तुम्हाला त्याचे वजन कळेल तर तुम्हाला धक्का बसेल. हा मासा पाहून लोक म्हणाले की, ‘हा खूप धोकादायक आहे.
सध्या सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. @scarlehtanderson या इन्स्टार्गाम अकाऊंटवरून हा व्हिडीओ या महिलेने शेअर केला आहे. ही महिला स्पेनची रहिवासी आहे. ती मासेमारीचा व्यावसाय करते. तिने नेहमी असे मोठे मासे पकडते. तसेच त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या खांद्यावर एक मोठा आणि जड मासा घेतलेला दिसत आहे. ती स्पॅनिशमध्ये काहीतरी बोलत आहे, जे समजत नाही, परंतु लोकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या, ज्यामुळे काही गोष्टी उघड झाल्या.
हा मासा ॲमेझॉनमध्ये आढळतो
स्कार्लेटने उचललेल्या माशाचे नाव अरापायमा आहे. हा मासा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत आढळतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या माशाची लांबी सुमारे 10 फूटांपर्यंत असते. त्या भागात खाद्य मासे म्हणून पकडले जातात. हे अतिशय धोकादायक आणि हिंसक मासे आहेत.
व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओला 16 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की ‘अरापायमा मासा लवकरच नामशेष होऊ शकतो. ॲमेझॉन नदीतून ते नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे.’ आणकी एकाने म्हणले आहे की, ‘हा मासा पाहून असे वाटते की त्याचे वजन 20 किलोपर्यंत असेल.’ ‘महिलेने पकडलेला मासा इतका मोठा आणि ताकदवान आहे की तो पकडताना या महिलेसारख्या चार जणांना धक्का देऊन खाली पडू शकतो.’ असेही एकाने म्हटले आहे.