आता तर कहरच! दिल्लीत मेट्रो सीटवरुन तरुणी अन् आज्जी थेट एकमेकींना भिडल्या, कारण काय तर..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Delhi Metro Viral Video : गेल्या काही काळात दिल्ली मेट्रो मनोरंजानाचे एक उत्तम ठिकाणी बनले आहे. सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी महिलांमध्ये तर कधी पुरुषांमध्ये सीटनवरुन वाद, तर कपल रोमान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी तर एका आजोबांनी मेट्रोमध्येच लघुशंका (Viral Video) केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पुन्हा एकदा सीटवरुन एका तरुणी आणि वृद्ध महिलेमध्ये जोरदार भिडत झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजी आणि एका तरुणीमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. मेट्रोमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी नाही. अगदी सीटवर बसायला जागाही आहे. परंतु आजी बाजूला सरकायला तयार नाहीत. यामुळे तरुणी एका चिमुकल्याला मुलाला सीटवरुन उठवत होती. परंतु आजींनी तिला फटकारले. आजींनी मुलाला सीट सोडण्यास नकार दिला. तरुणी बऱ्याच वेळी मुलाला उठण्यास सांगत होती, मात्र आजींनी मुलाला उठून दिले नाही. तुम्ही पाहू शकता की, दोघीही जोरदार भांडण करत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आसपासचे लोक केवळ त्यांची भांडणे बघत आहेत. व्हिडिओवरुन मुलगा कदाचित आजींचा नातू असावा असा अंदाज लावला जात आहे.
व्हायरल व्हिडिओ
Feminist girl wanted the boy to get up and give his seat to her. His grandmother said no 😂pic.twitter.com/tPYgk5162O — Ambar (@Ambar_SIFF_MRA) November 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ambar_SIFF_MRA या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका युजरने म्हटले आहे की, हे काही आता नवीन राहिले नाही, तर दुसऱ्या एकाने रोज मेट्रोत आता पॉपकॉर्न घेऊ जातो मी असे म्हटले आहे. तर काहींनी आजींनी बरोबर केले, या मुलींना फेमीनिस्टचा अर्थ पण नाही माहिती आणि चालल्यात फेमिनीस्ट बनायला असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






