Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, डान्स असे वेगेवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धोकादायाक स्टंटच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाईक्स आणि व्ह्यूज ने लोकांना वेड लावले आहे. पण अनेकदा असे धोकादायक स्टंट लोकांच्या अंगलट आले आहेत. मात्र तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती दुचाकीवर भयानक स्टंट करताना दिसत आहे. यामुळे त्याचा जीव देखील जाण्याची शक्यता आहे. परंतु याची त्याला कसलीही भीती नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नागपूरमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. वर्धमान परिसरातील पारडी उड्डाण पुलावर एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात आहे. ही व्यक्ती स्कूटीवर स्टंट करत आहे. या व्यक्तीने स्कूटीवर हॅंडलवरील हात सोडला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती स्कूटीवर मांडी घालून बसला आहे. दोन्ही हात सोडून, मांडी घालून हा व्यक्तीने हा स्टंट केला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांच्या गणवेशात व्यक्ती असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Nagpur: Man in Khaki Uniform Caught Performing Stunts on E-Bike, Video Goes Viral#Nagpur #Maharashtra pic.twitter.com/U2p1Q3rcnM
— अभिषेक ‘अजनबी’ ✍🏻 (@abhishekAZNABI) June 30, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @abhishekAZNABI या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी पठ्ठ्या पोलिसच्या गणवेशात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने युनिफॉर्मचा गैरवारर होत आहे, या लोकांनीच असे केले तर सामान्यांनी काय करायचे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने याला हाणला पाहिजे असे म्हटले आहे. दरम्यान अद्याप गणवेशातील व्यक्ती नमेकी पोलिस कर्मचारी आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबतही शंका निर्माण झाली आहे. परंतु हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.