(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडओमध्ये, तुम्हाला दिसेल की एक मुलगा आणि मुलगी जमिनीवर खरे साप आणि शिडी ठेवून खेळ खेळत आहेत. यासाठी, दोघेही जमिनीचा एक चौरस चौरस निवडतात आणि त्या चौकात अनेक जिवंत साप पसरवतात. याशिवाय, जमिनीवर अनेक शिड्या देखील ठेवल्या जातात. यानंतर, दोघेही एका मोठ्या फास्याने खेळ खेळू लागतात. तुम्हाला दिसेल की मुलगा हातात फासा घेतो आणि हवेत फेकतो, त्यावर जो काही आकडा येईल, मुलीला तेवढे चौरस पुढे जावे लागते. मुलगी जशी पुढे जाते तसे साप तिच्यावर हल्ला करायला आपला फणा काढतात. सापांचा हल्ला पाहताच मुलगी घाबरते आणि पटकन पलिकडे जाऊन उभी राहते. तरुण-तरुणीचा हा थरारक खेळ आता सर्वांनाच चक्रावून टाकत आहे. त्यांचा हा खेळ धोकादायक असून यात जीवाचा धोकाही फार आहे ज्यामुळे यूजर्सने सुरक्षेसाठी चिंता व्यक्त केली.
मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!
हा व्हिडिओ @kangden_kebonreptile नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लाइव्ह गेम नाही हा तर लाइव्ह मृत्यू आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खोलीत प्रवेश करताच मी बेशुद्ध पडेन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सापांना हा गेम नक्कीच आवडेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






