(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. बऱ्याचदा इथे काही धक्कादायक अपघातांचे व्हिडिओही शेअर केले जातात. सध्याही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर ट्रेन अपघाताच्या अनेक घटनांविषयी ऐकले असेल. या व्हायरल व्हिडिओतही अशाच एका घटनेचे दृश्य दिसले ज्यात एक तरुण घाई घाईत चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत एक गंभीर अपघात घडून येतो. यावेळी पोलीसही तेथे उपस्थित असतात जे हा सर्व प्रकार पाहून आवाक् होतात.
हा व्हायरल व्हिडिओ मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल. तरुण धावत धावत ट्रेनजवळ येतो यावेळी ट्रेन सुरु झालेली असते. अशात आपली ट्रेन जाईल या भीतीने तो धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा पाय घसरतो आणि तो अचानक ट्रेनखाली जातो. यावेळी तो पूर्णपणे खाली जाईल तितक्यातच तिथे उभा असलेला पोलीस कर्मचारी धावत जातो आणि त्याला रेल्वेट्रॅकखालून वर ओढतो. त्यानंतर आणखी एक महिला पोलीस कर्मचारी आणि इतर लोक मदतीला धावून येतात.
पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणाचा जीव थोडक्यात वाचतो. ही संपूर्ण घटना तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यातील दृश्यांनी लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला.
अपघातची ही घटना @jayprakashindia नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची देण्यात आली आहे. यात लिहिले आहे की, ‘मुंबई रेल्वेच्या सहाय्यक उपनिरीक्षकाच्या तत्परतेमुळे रविवारी अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरील लोकशक्ती एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान पडलेल्या एका प्रवाशाचा जीव वाचला. मुंबई रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक पाहुप सिंग हे अंधेरी रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असताना लोकशक्ती ट्रेनने फलाट क्रमांक 08 सोडताच एका प्रवाशाने धावत धावत चालत्या ट्रेन आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी आला, काही अंतरावर उपस्थित असलेल्या सिंगने तत्परता दाखवून प्रवाशाला बाहेर काढले, त्याने आपले नाव राजेंद्र मांगीलाल, वय (40) सांगितले, तो अंधेरी 7 बंगला बेस्टमध्ये राहतो, राजेंद्रने सांगितले’.
*मौत से मुंह से यात्री को बचाया!*
मुंबई रेलवे के एक सहायक उपनिरीक्षक की तत्परता के चलते रविवार को अंधेरी रेलवे स्टेशन के प्लेटफार्म नंबर 8 पर लोक शक्ति एक्सप्रेस और प्लेटफार्म के बीच गिरे हुए एक यात्री को बचा लिया गया |
मुंबई रेलवे के सहायक उप निरीक्षक पहुप सिंह अंधेरी… pic.twitter.com/UkQwL5Qart
— Jayprrakash Singh (@jayprakashindia) February 16, 2025
तरुणाने सांगितले की, मला अहमदाबादला जायचे आहे आणि मी प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर गाडी पुढे जाऊ लागली. माझ्याकडे या ट्रेनचे तिकीट होते. यामुळे मी चालत्या वाहनात चढण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्याने खाली पडलो. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानांनी मला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील दरीतून बाहेर काढले. त्यानंतर सदर व्यक्तीला अरवली वाहनाने अहमदाबादला पाठवण्यात आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.