(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे अनेक अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्या आपल्या आश्चर्याचा धक्का देतील. आताही इथे असाच एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीला बाईकवर बसून ‘मौत का कुआ’ ची सफर दिल्याचे दिसून येत आहे. तुम्ही अनेकदा मौत का कुआ कोणत्या चित्रपटात अथवा जत्रेत पाहिला असेल. हा एक खेळ आहे जो आपला जीव देखील घेऊ शकतो आणि म्हणूनच याला ‘मौत का कुआ’ हे नाव देण्यात आले आहे. ज्यात जायला भल्याभल्यांना घाम फुटतो अशा ‘मौत का कुआ’ मध्ये तरुणाने चक्क आपल्या प्रेयसीला नेले जे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. आता यात पुढे काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुण आपल्या प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून ‘मृत्यूच्या विहिरीत’ मौत का कुआ मध्ये स्टंट करताना दिसत आहे. मुलगी बाईकच्या टाकीवर घाबरून बसली आहे, पण तिचा प्रियकर स्टंट दाखवू लागताच, ती थोडी बेफिकीर होते. दोघेही ‘मौत का कुआ’ मध्ये एक मजेदार आणि साहसी राइड करतात जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या प्रेयसीला उत्साहित पाहून, तरुण पूर्ण उत्साहाने बाईक वेगाने चालवतो आणि अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू बाईक जमिनीवर आणतो. तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील प्रियकर प्रेयसीचा साहस पाहून आता युजर्स अवाक् झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेक युजर्सने कमेंट्स करत या अनोख्या रायडींगवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले या आहे, “त्यांना लग्न करू द्या, मग खरा होईल मृत्यूचा खेळ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रायडर्स लोकांची ड्रीम GF, अशावेळी इतकं सहकार्य”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निव्वळ वेडेपणा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.