मुस्लीम वेषात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणांच्या व्हिडिओमुळे मोठा वाद पेटला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यासाठी हर की पौडी आणि कुंभ क्षेत्रात गैर-हिंदूंना प्रवेश नाकारावा याची मागणी केली जात होती. अशा परिस्थिती तरुणांच्या मुस्लिम वेशातील वावरामुळे हा वाद आणखी पेटला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण शेखांसारखा पोषाख परिधान करुन फिरताना दिसत आहेत. लोक त्यांना पाहू आश्चर्यचकित झाले आहे. काहीजण त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत. परंतु या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल व्हिडिओ
A “Sheikh” surprise in Haridwar! Visitors at the sacred Har Ki Pauri were left stunned when a group of youths appeared dressed in traditional Arab Sheikh attire. Strolling along the ghats with full swag, their unique “Sheikh style” quickly caught everyone’s eye and went viral.… pic.twitter.com/amaOYDHJBy — NewsX World (@NewsX) January 13, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओमुळे वाद पेटला असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक याला केवळ प्रसिद्धीसाठीचे कृत्य म्हणत आहेत, याला रील व्हायरल करण्याचा नवा फंडा म्हणत आहेत. परंतु काही लोकांनी धार्मिक स्थळांवरील नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा निषेधही केला जात आहे. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






