फोटो सौजन्य: ऑफिसिअल एक्स अकाउंट पीटीआय
नवी दिल्ली: भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. आज भारत 78 वां स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताची खाद्य संस्कती, परंपरा, कला खूप विभिन्न आहे. आपली भारतीय संस्कृती इतर देशातही लोकप्रिय आहे. संपूर्ण जग भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या देशांशी संघर्ष आहे त्यांनाही आपल्या परंपरा आत्मसात केली आहे.
असेच काहीसे नुकतेच चीनमध्येही पाहायला मिळाले आहे. चीनमधील लोक भारतीय नृत्याच्या अनोख्या कलेने इतके प्रेरित आहेत. एका चिनी मुलीनेही भरतनाट्यम नृत्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पीटीआय वृत्तसंस्थेने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक मुलगी स्टेजवर भरतनाट्यम नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हाला नक्कीच ती भारतीय मुलगी असल्याचा भास होईल. पण तसे नाही. ती एक चिनी मुलगी आहे, तिचे नाव लेई मुझी आहे.
हे दखील वाचा – भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा जगभरात जल्लोष; अमेरिकेने दिल्या खास शुभेच्छा
13 वर्षांच्या चिनी मुलीने डान्स केला
मुलगी फक्त 13 वर्षांची आहे आणि तिने अरंगेत्रममध्ये हा परफॉर्मन्स दिला आहे. एका पदवीदान समारंभत भरतनाट्यमचे विद्यार्थी त्यांच्या गुरू आणि लोकांसमोर सादर केले आहे. लेईने हे एकल नृत्य प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लीला सॅमसन, भारतीय मुत्सद्दी आणि चिनी नागरिकांसमोर केले. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडीओ
VIDEO | Lei Muzi, a 13-year-old school student, scripted history when she performed Bharatanatyam “Arangetram” in China, a landmark in the journey of the ancient Indian dance form that is gaining popularity in the neighbouring country. pic.twitter.com/OaOlc9EEhh
— Press Trust of India (@PTI_News) August 13, 2024
व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
लोकांनी या व्हिडिओवर सकारात्मक कमेंट करत मुलीचे कौतुक केले आहे. एकाने सांगितले की मुलीने खूप सुंदर नृत्य केले आहे. एकाने सांगितले की, ‘आपली भारतीय मुले पाश्चात्य संस्कृती अंगीकारत आहेत आणि मातृभाषेत बोलायला लाज वाटत आहेत, तर चिनी मुले भारतीय मूल्ये शिकत आहेत. एकाने सांगितले की, ‘मुलीने कोणतीही चूक न करता संपूर्ण नृत्य सादर केले.’ तर आणखी एका युजरने म्हणले आहे की, आपली भारतीय सगळ्यात श्रेष्ठ आहे.