आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो...; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, 'तो' VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खामेनेई यांना भेटायला एक लहान मुलगा आलेला आहे. यावेळी लहान मुलगा खामेनेईंना, मला शहीद व्हायचे आहे असे म्हणतो. यावर खामेनेई चिमुरड्याला अगदी मोलाचा सल्ला देतात. त्याला समजवत ते म्हणतात की, तू आधी मोठा हो, बाळ आता तुझे वय शहीद होण्याचे नाही तर शिक्षण घेण्याचे आहे. तू अभ्यास कर, विज्ञान शिक आणि एक महान शास्त्रज्ञ हो. जेव्हा तु मोठा होशील आणि तुझे शरीर थकलेले असेल तेव्हा मृत्यूता वितार करत. सध्या देशासाठी जग आणि शिक्षणे ते महत्वाचे आहे.
जब एक बच्चे ने ईरान के सर्वोच्च नेता स्वर्गीय अली #Khamenei से कहा कि वह शहीद होना चाहता है, तो अली खामेनेई ने उसे पहले पढ़ाई करने, वैज्ञानिक बनने, जीवन जीने और फिर जब बूढ़े और कमजोर हो जाओ, तब मरने की सलाह दी। आज, उन्होंने अमेरिका और इज़राइल के हमले के दौरान अपना घर छोड़ने… pic.twitter.com/4B4lkEbe16 — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) March 1, 2026
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण खामेनेईंचे कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरु आहेत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. सध्या खामेनेईनंतर इराणची सत्ता कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






