सिरियामधून 1500 दहशतवादी फरार (फोटो- istockphoto)
सिरियामधील शद्दा्दी तुरुंगातून पळाले दहशतवादी
ईसिसचे 1500 दहशतवादी फरार
सिरिया सरकारचे सर्च ऑपरेशन
सिरियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिरियाच्या शद्दा्दी जेलमधून इसिसचे दहशतवादी फरार झाल्याची बातमी समोर आली आहे. इसिसचे तब्बल थोडे थोडके नव्हे तर 1500 दहशतवादी फरार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. सिरिया सरकारच्या माहितीनुसार 120 दहशतवादी फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बाहेर 1500 हा आकडा सांगितलं जात आहे.
दहशतवादी फरार झाल्याचे समजताच सिरिया सरकारने आणि सीरया सुरक्षा दलांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या घटनेमुळे सिरियामध्ये सरकार विरुद्ध इसिस हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. सिरिया देशाच्या पूर्वेकडील भागात शद्दा्दी जेल असून या जेलची सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. जेलमधून 120 दहशतवादी फरार झाल्याचे सांगितले जात असले तरी कुर्दिश मीडियानुसार 1500 आकडा सांगितला जात आहे.
दहशतवादी फरार झाल्याची माहिती प्राप्त होताच सिरिया सरकार सतर्क झाले आहे. सरकारचे अतिविशेष सुरक्षा दलांनी शद्दा्दी परिसरात घुसले आहेत. तसेच विशेष सर्च ऑपरेशन राबवत तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली आहे. बाकीच्या फरार दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या परीसराला वेढा घालण्यात आला आहे.
किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना घेरलं! Jammu Kashmir मध्ये इंडियन आर्मीने थेट…
किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना घेरलं!
जम्मू काश्मीर राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध सर्च ऑपरेशन राबवले आहे. दरम्यान हे सर्च ऑपरेशन आज देखील सुरू आहे. त्यामुळे किश्तवाडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी परिसर वेढला आहे.
किश्तवाड जिल्ह्यातील मंडल सिंहपोरा सोनार गावात जैश ए मोहम्मदचे दोन, चार दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली आहे. त्यानंतर सुरक्षा दलाने या गावाला चारही बाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी लष्कराने आधुनिक हत्यारांचा वापर करत आहे.
हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त
दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधला आहे. हा परिसर 12000 फुट उंचीवर असल्याने भारतीय लष्कर ड्रोन्स आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करत आहे. याच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.






