कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या; हरसिमरत रंधावासोबत नक्की काय घडलं? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हॅमिल्टन (कॅनडा) : कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील हॅमिल्टन शहरात गोळीबाराच्या घटनेत हरसिमरत रंधावा (वय 21) या भारतीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण भारतीय समुदायात शोककळा पसरली आहे. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता, ती बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी असताना ही अनपेक्षित घटना घडली.
हरसिमरत ही मोहॉक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आणि काही काळापूर्वीच भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी आली होती. घटनेच्या दिवशी ती आपल्या नेहमीच्या मार्गावर बसची वाट पाहत असताना अचानक दोन कारमध्ये गोळीबार सुरू झाला. काळ्या रंगाच्या सेडानमधून एका व्यक्तीने पांढऱ्या सेडानवर गोळ्या झाडल्या, आणि त्यात हरसिमरतच्या छातीत एक गोळी घुसली.
तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिची स्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी तिचा मृत्यू घोषित केला. विशेष म्हणजे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हरसिमरतचा या घटनेशी कोणताही संबंध नव्हता. ती संपूर्णपणे निर्दोष होती आणि चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्याने ती या हिंसेचा बळी ठरली.
We are deeply saddened by the tragic death of Indian student Harsimrat Randhawa in Hamilton, Ontario. As per local police, she was an innocent victim, fatally struck by a stray bullet during a shooting incident involving two vehicles. A homicide investigation is currently…
— IndiainToronto (@IndiainToronto) April 18, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : श्रीलंकेचा भारताभिमुख निर्णय; उचलले ‘असे’ पाऊल पाकिस्तान पडला तोंडावर
हॅमिल्टन पोलिसांनी या घटनेचा तपास खुनाचा गुन्हा म्हणून सुरू केला आहे. त्यांच्याकडून परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की १६ एप्रिल संध्याकाळी ७:१५ ते ७:४५ वाजेच्या दरम्यान अप्पर जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोड परिसरात कोणी होते का, तसेच डॅशकॅम फुटेज किंवा सीसीटीव्ही क्लिप्स असल्यास ती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी. गोळीबारात जवळील एका घराच्या खिडकीचेही नुकसान झाले असून, घराबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनाही धोका झाला होता, पण इतर कुणीही जखमी झालेले नाही.
🚨 A 21-year old Indian student, Harsimrat Randhawa, was killed in Canada after she was struck by a stray bullet as she was waiting at a bus stop on her way to work. pic.twitter.com/66NcXyqBbR
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) April 19, 2025
credit : social media
कॅनडामधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, एका निवेदनात म्हटले आहे, “ओंटारियोमधील हॅमिल्टन येथे भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्हाला खूप दुःख झाले आहे. ती निर्दोष होती.” दूतावासाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच, कॅनेडियन पोलिसांकडून सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे. ही घटना परदेशात शिक्षण घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्का देणारी आणि चिंता वाढवणारी ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अवकाशातही होतात भूकंप? जाणून घ्या त्याचा नक्की पृथ्वीवर काय होतो परिणाम
हरसिमरत रंधावाच्या निधनाने पुन्हा एकदा विदेशात भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर गेलेल्या तरुण मुलीचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे प्रशासकीय यंत्रणा आणि समाजासाठीही गंभीर चिंतेचा विषय आहे. या प्रकरणात लवकर न्याय मिळावा, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. हरसिमरतचा मृत्यू केवळ एक आकडा नसून, ती एक स्वप्न पाहणारी, पुढच्या आयुष्याची तयारी करणारी तरुणी होती, जी दुर्दैवाने हिंसेचा बळी ठरली.