डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचे उल्लंघन; फ्लोरिडा रिसॉर्टवरून 3 नागरी विमानांचे उड्डाण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडायेथील पाम बीच येथील मार-ए-लागो रिसॉर्टच्यावरील हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन सिव्हिलियन विमानांनी प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने F-16 लढाऊ विमाने पाठवून त्यांना हवाई हद्दीतून बाहेर काढण्यात आले. या विमानांनी हवाई क्षेत्रात प्रवेश का का केला होता याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फेब्रुवारीत हवाई उल्लंघनाच्या घटना
मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11: 05, दुपारी 12:10 आणि 15:50 विमानांनी रिसॉर्टवरुन उड्डाण केले. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातही अशा घटना वारंवार घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये असताना तीन वेळा हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाले होते. 15 फेब्रुवारीला दोन वेळा आणि 17 फेब्रुवारीला राष्ट्रपती दिनीही अशा घटना घडल्या होत्या. ट्रम्प यांच्या इस्टेट भेटींदरम्यान अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, उल्लंघन करणारी तीनही विमाने सिव्हिलियन होती, या अनधिकृत विमानांनी एकामागून एक प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ला F-16 लढाऊ विमाने पाठवावी लागली. या लढाऊ विमानांनी सिव्हिलियन विमानांना तातडीने बाहेर जाण्याचा इशारा दिला.
फ्लेयर्सचा वापर करुन कारवाई
F-16 लढाई विमानांनी या सिव्हिलियन विमानांना हवाई क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी फ्लेयर्सचा वापर केला. फ्लेयर्स हे एक प्रकारचे प्रकाशमान सिग्नल असतात. हे सिग्नल्स कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण न करता पायलटला योग्य दिशेने जाण्याचा इशारा देतात. मीडिया रिपोर्टनुसार, लढाऊ विमानांनी ही कारवाई पूर्ण केल्यानंतर ट्रम्प सुरक्षितपणे मार-ए-लागो रिसॉर्टवर पोहोचले.
ही घटना सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी चिंता निर्माण करणारी आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किंवा माजी राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या ठिकाणी, अत्यंत कडक सुरक्षाबंदोबस्त असते. यामुळे सिव्हिलयन विमानांचे वारंवरा होणार उल्लंघन तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
तात्पुरती उड्डाण निर्बंध लागू
सध्या ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अशा घटना वारंवार घडत असल्याने मास-ए-लागो रिसॉर्टच्या आसपास उड्डाण निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार परवानगीशिवाय सिव्हिल विमाने आणि ड्रोन या परिसरात उड्डाण करु शकत नाही.