श्रीलंकेत ६० भारतीयांना अटक (फोटो सौजन्य - iStock
श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यात सहभागी असलेल्या 60 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. या सर्व भारतीयांना राजधानी कोलंबोच्या माडीवेला आणि बट्टारामुल्ला उपनगरे आणि नेगोम्बो या पश्चिम किनारपट्टीवरील शहरातून अटक करण्यात आली आहे.
श्रीलंका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने अटक केलेल्या भारतीय नागरिकांकडून 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉपही जप्त केले आहेत. एजन्सीनुसार, पोलिस प्रवक्ते एसएसपी निहाल थलदुवा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोशल मीडियावरील संवादासाठी रोख रक्कम देण्याचे आमिष दाखवून पीडितेला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणण्यात आले. प्राथमिक पैसे दिल्यानंतर उर्वरित पैसे जमा करण्यास पीडितांना भाग पाडल्याचे तपासादरम्यान उघड झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
दुबई – अफगाणिस्तानशी संबंध
स्थानिक वृत्तपत्र डेली मिररच्या बातमीनुसार, पेराडेनिया येथील एका पिता-पुत्राने फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर, नेगोम्बो येथील एका आलिशान घरावर छापा टाकून 13 संशयितांना अटक करण्यात आली आणि 57 फोन आणि संगणकही जप्त करण्यात आले. त्यानंतर नेगोम्बोमध्येच केलेल्या कारवाईत आणखी 19 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांचे दुबई आणि अफगाणिस्तानशीही संबंध आहेत.
सायबर क्राईम म्हणजे काय?
सायबर क्राईम हा संगणक अर्थात कॉम्युटर-लॅपटॉप नेटवर्कशी संबंधित अपराध आहे. कॉम्युटर-लॅपटॉपचा वापर करून ऑनलाईन अपरातफर, फसवणूक केली जाते त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं आणि सध्या असे अनेक ऑनलाईन फ्रॉड चालू असल्याचेही दिसून येत आहे. यासाठी गुन्हे अन्वेषण शाखा कारवाई करतानाही दिसते.