ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर विविध देशांत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भारतातही आज (११ सप्टेंबर) रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील.
[read_also content=”पश्चिमच्या प्रवाशांना दिलासा; मध्यच्या मेन आणि हार्बर मार्गांवर आज असा आहे MegaBlock https://www.navarashtra.com/maharashtra/relief-to-western-travelers-today-there-is-a-megablock-on-central-main-and-harbor-lines-nrvb-324465.html”]
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल. आज सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील. तसेच आज देशात मनोरंजनाचे कोणतेही कार्यक्रम होणर नाही.
[read_also content=”विसर्जनाच्यावेळी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये महाराष्ट्रात 20 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/a-total-of-20-people-died-in-maharashtra-in-different-incidents-during-immersion-324438.html”]