संग्रहित फोटो
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संशयिताने बिहारमधील काही व्यक्तींना हाताशी धरून तालुक्याच्या ग्रामीण भागातील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरू केली होती. फॅक्टरीचे ठिकाण, हालचाली आणि संपर्क याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने ही बाब दीर्घकाळ कोणाच्या लक्षात आली नव्हती. मात्र, जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाला याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अचानक छापा टाकत कारवाई केली. ही कारवाई पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली असून, स्थानिक पोलिसांना याची पूर्वकल्पना नव्हती, हे विशेष बाब म्हणून पुढे येत आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी कराड शहरातील एका नामवंत मद्य व्यावसायिकाच्या मुलाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघडकीस आला होता. त्या घटनेशी सदर प्रकरणाचा काही संबंध आहे का?, याचीही तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.
या कारवाईमुळे कराड तालुक्यात पुन्हा एकदा एम. डी. ड्रग्जसारख्या घातक अमली पदार्थांचा काळाबाजार सक्रिय असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी व्याप्ती आणि जबाबदार व्यक्ती स्पष्ट होतील, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव
ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका
शिरूरसारख्या शहरातून देशभरात पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यासह जिल्ह्यात देखील या ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे रोवली गेल्याचे वास्तव समोर आले आहे. पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज उघडकीस आल्यानंतर जोरदार कारवाई करत ड्रग्जची साखळी मोडत एजंटना दणका दिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पुणे पोलिसांनी सर्वाधिक कारवाया करत तब्बल ३१९ जणांना अटक केली आहे. तर २०१५ गुन्हे नोंदवले आहेत. तुलनेने ड्रग्जचा साठा आकडेवारीत कमी असला तरी पाळेमुळे खोदण्यात पोलिस यशस्वी झाल्याचे दिसत आहे. यासोबतच आता पुणे ग्रामीण पोलिसांना देखील पसरलेली ही साखळी मोडीत काढावी लागणार आहे.






