फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर इस्त्रायलने इराणच्या गाझामध्ये जोरदार हवाई हल्ले केले. मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने म्हटले आहे की, इराणने इस्त्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आणि केल अवीववरील हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने हल्ले केले आहेत. हिजबुल्ल्हाप्रमाणेच इराणलाही आम्ही संपुष्टात आणणार आहोत. दरम्यान इस्त्रायल इराणवर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत असतानाच अमेरिकेने मदतीचा हात मागे घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रत्युत्तरात इस्त्रायल इराणवर इराणच्या आण्विक साइटवर हल्ला करणार असल्याचे अमेरिकेने उघड केले आहे. मात्र ही माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा देण्यापासून माघार घेतली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अस म्हटले आहे की, आम्ही या ह्ल्ल्यांचे समर्थन करणार नाही.
इराणने इस्त्रायलवर हल्ला करून मोठी चुक केली
इराणेने दोन दिवसांपूर्वी इस्त्रायलच्या तेल अवीववर सुमारे 200 सुपरसॉनिक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. त्यामुळे इस्रायल भडकले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, इराणने आमच्या देशावर हल्ला करून मोठी चूक केली असून याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल इराणच्या आण्विक साइटला लक्ष्य करू शकते, असे बोलले जात आहे. पण आता जो बायडेन यांनी इस्रायलला स्पष्ट इशारा दिला आहे की, असे केल्यास अमेरिका इस्त्रायला पाठिंबा देणार नाही.
इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांवर हल्ला
मीडिया रिपोर्टनुसार इराणच्या हवाई हल्ल्यानंतर इस्त्रायल आता संयुक्त राष्ट्रांना लक्ष्य करत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस व्यक्तिमत्व नॉन ग्राटा यांनी सांगितले आहे की, इस्त्रायने त्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या हल्ल्याचा निःसंदिग्धपणे निषेध न केल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे. बॉम्बस्फोटानंतर गुटेरेस यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “मी मध्य पूर्व संघर्षाच्या विस्ताराचा निषेध करतो, जो सतत वाढत आहे. हे थांबायला हवे. युद्धबंदीची निश्चितच गरज आहे.” या निर्णयामुळे इस्रायल आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील वाद आणखी वाढला आहे.
भारतीयांमध्ये भितीचे वातावरण
इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध शिगेला पोहचला आहे त्यामुळे इस्त्रायल मधील भारतीयंमध्ये भितीचे वातावरण निर्णाण झाले आहे. इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. दूकावासाने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “कृपया सावधगिरी बाळगा, देशातील अनावश्यक प्रवास टाळा आणि सुरक्षित आश्रयस्थानांजवळ रहा. दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे,” असे दूतावासाने आपल्या सल्लागारात म्हटले आहे.