अमेरिकन सरकारचे हात रक्ताने माखलेले; इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई अमेरिकेवर बरसले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेवर टीका केली. ते म्हणाले की, अमेरिकेचे हात रक्ताने माखले आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सगळ्या दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. खमेनी म्हणाले की, अमेरिकन सरकारचे हात रक्ताने माखले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले गाझा आणि लेबनॉनमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अमेरिका स्पष्टपणे ज्यूंचा भागीदार आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर इराणने काय म्हटले?
यापूर्वी इराणनेही अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा पराभव केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगई म्हणाले होते की, अमेरिकन निवडणुका म्हणजे अमेरिकन सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनाचा आढावा घेण्याची संधी आहे.
अमेरिकन सरकारचे हात रक्ताने माखलेले; इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई अमेरिकेवर बरसले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हे देखील वाचा : अमेरिकेत जन्माने मिळणार नाही नागरिकत्व! डोनाल्ड ट्रम्पचा निर्णय, लाखो भारतीयांवर होणार परिणाम
बघाई म्हणाले, ‘अमेरिकन सरकारच्या पूर्वीच्या धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा आम्हाला कटू अनुभव आला आहे. पण ही निवडणूक म्हणजे भूतकाळातील चुकीच्या दृष्टिकोनाचा आढावा घेण्याची संधी आहे. असा टोला त्यांनी अमेरिकेवर लगावला आहे.
हे देखील वाचा : इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधण्यासाठी जलमार्ग वापरला जात होता; 4000 वर्षे जुने गूढ उकलल्याचा शास्त्रज्ञांचा दावा
इराणवर कडक निर्बंध लागू होऊ शकतात
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर अमेरिका इराणवरील निर्बंध आणखी कडक करू शकते, असे मानले जात आहे. ट्रम्प यांनी 2018 मध्ये इराणवर अनेक निर्बंध लादले होते. वास्तविक, इस्रायलचे गाझामध्ये हमास आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह यांच्याशी युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणही हमास आणि हिजबुल्लाला साथ देत आहे. काही काळापूर्वी इराणनेही थेट इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली होती. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही इराणवर हल्ला केला. या युद्धात अमेरिका इस्रायलला मदत करत आहे. अशा परिस्थितीत इराण सातत्याने अमेरिकेला लक्ष्य करत आहे.