अमेरिकन युट्यूबरची भारतात मनमानी! परवानगीशिवाय प्रतिबंधित भागात घुसखोरी; बसणार कारवाईचा दणका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. एका 24 वर्षीय अमेरिकन युट्यूबरने भारताच्या प्रतिबंधित क्षेत्रात विना परनवागी प्रवेश केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंद महासागरातील एका प्रतिबंधित बेटावर या अमेरिकन युट्यूबरने घुसखोरी केली आहे. त्याने तेथील जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भारतीय पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा यूट्यूबर अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मिकाउलो विक्टोरोविच पोलियाकोव्ह असे त्याचे नाव आहे.
09 मार्च रोजी त्याने भारताच्या अंदमान निकोबार बेटांवरील प्रतिबंधित सेंटिनेलमध्ये प्रवेश केला होता.त्याने या ठिकाणी राहणाऱ्या सेंटिनेलीज जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 31 मार्च रोजी भारतीय पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोर्ट ब्लेअरमध्ये त्याला अटक केली. सध्या त्याला स्थानिक न्यायलयाने 14 दिवसांच्या न्यालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
17 एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ब्लेअरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबरला पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दंड आकारण्यात येऊ शकतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलियाकोव्ह GPS नेव्हिगेशच्या सहाय्याने युट्यूबर सेंटिनल बेटावर पोहोचला. बेटावर उतरण्यापूर्वी त्याने दुर्बिणीने संपूर्म बेटाचे सर्वेक्षण केले. युट्यूबरने 1 तास प्रतिबंधित सिंटेनल बेटावर घालवला. या काळात त्याने शिट्टी वाडवून तेथील सेंटिनेली जमातींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर त्याने एक डायट कोक आणि नारळ ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला आणि काही वाळूचे नमुने गोळा केले. एका स्थानिक मच्छामाराकडून पोलिसांनी या सर्व प्रकराची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पोर्ट ब्लेअरलमध्ये अटक केली. त्याच्यावर भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी म्हटले की, बेटावर जाण्यापूर्वी पोलियाकोव्हने समुद्राची परिस्थीती, भरतीअओहोटी आणि बेटावर जाण्याचा सखोल अभ्यास केला होता. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जानेवरीच्या सुरुवातीला बेटावर जाण्याची त्याने योजना आखील होती.परुंत पोलियाकोव्हच्या या कृतींमुळे सेंटिनेली लोकांचे जीवन धोक्यात आहे. ही प्रजाती शतकानुशकते जुन्या जीवनशैलीचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी राहते. यामुळे येथे बाहेरच्या लोकांना प्रवेश करण्यास कायदेशिरित्या बंदी आहे.
सेंटिनेलीज लोक गे आफ्रिकेतून स्थालांतरित झालेल्या मानवी गटाचे वंशज असल्याचे म्हटले जाते. सुमारे 2 लाख वर्षापूर्वी हा गट आफ्रिका सोडून पूर्वेकडे गेला आणि जगभर पसरला.यादरम्यान काही गटांनी भारताच्या दश्रिण किन्याऱ्यावर, अंदमान निकोबार बेटांवर, आणि आग्नेय आशियात प्रवेश केला. सेंटिनेलीज, जरावा, ओंगे यासारख्या जमातीचे लोक या बेटांवर राहतात.लहान बोटी आणि तराफ्यांच्या मदतीने हे लोक बेटावर पोहोचले.
यांच्या चालीरिती, सामाजिक व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा बाहेरच्या जगापेक्षा अगदी वेगळ्या आहेत. बारेच्या लोकांचे बेटावर जाणे हे धोक्यासारखे मानतात, ते लोकांवर हल्ला देखील करु शकतात.यापूर्वी अनेक वेळा या जमातींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.