मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानमधील खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नुकतेच अमेरिकेने बलुचिस्तानमधील खनिजांच्या रेको डीक प्रल्पासाठी १.२५ अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे. या बदल्यात बलुचिस्तानच्या नैसर्गिक खनिजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका देखील पाकिस्तानच्या हातची कठपुतळी बनत चालला आहे. यामुळेचे गेल्या अनेक काळापासून ट्रम्प पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ आणि असीम मुनीरला सतत व्हाइट हाइसमध्ये निमंत्रित करत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तानमधील नैसर्गिक संपत्तीचा साठा समृद्ध पण मागसलेला आणि अस्थिर आहे.
पाकिस्तानने दावा केला आहे की, बलुचिस्तानमध्ये प्रचंड तांबे आणि सोन्याचे साठे आहेत. परंतु पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्या पाकिस्तानला अमेरिकेने खाण प्रल्कपाला पाठिंबा देण्यासाठी एक्झिम बॅंकेकडून २ अब्ज डॉलर्स गुंतवणूक मंजुर केली आाहे. या प्रकल्पाचे नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्पर्धी सुरु होती.
अमेरिकेच्या चार्ज डी अफेर्यस नताली बेकर यांनी म्हटले आहे की, एक्झिम बॅंक पुढील काही वर्षात पाकिस्तानच्या खाण क्षेत्रात गुंतवणूक केरेल. या गुंतवणूकीत अंतर्गत अमेरिकेची उत्खननाची साधने, उच्च-तंत्रज्ञान सेवा आणि प्रकल्प संचलानासाठी लागणाऱ्या सुविधा पाकिस्तानाला दिल्या जाणार आहे. या अतंर्गत पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये ७,५०० रोजगार आणि अमेरिकेत ६००० नोकऱ्या निर्माण होतील असे नताली यांनी सांगितले आहे.
सध्या या सर्व घडामोडींदरम्यान ट्रम्प प्रशासनाच्या आणि पाकिस्तानच्याा वाढत्या जवळीकतेची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. या खाण डीलमुळे केवळ खनिजेच नव्हे, तर भू-राजकीय गणितही असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका याचा वापर इराणविरोदी धोरणासाठी करुन शकतो. सध्या अफगाणिस्तान इराण सीमेवर देखील तणाव वाढत आहे. इराणने अफगाणिस्तानच्या अनेक नागरिकांना हद्दपार केले आहे. तर पाकिस्तान याचा वापर भारत-विरोधी करु शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक
Ans: रेको डीक खाण प्रकल्प हा बलुचिस्तानमधील तांब्याच्या-सोन्याच्या खाणीचा एक प्रल्कप आहे. येथील खनिज साठे हे पाकिस्तानसाठी आर्थिक स्त्रोत मानले जातात.
Ans: अमेरिकेने पाकिस्तानला १.२५ अब्ज डॉलर्स हे रेको डीक खाण प्रकल्पासाठी दिले आहेत.या गुंतवणूकीतून अमेरिकेतन उत्खनन उपकरणे वापरली जाणार आहेत, ज्यामुळे अमेरिकेलही व्यावसायिक स्तरावर मोठा फायदा होणार आहे.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, बलुचिस्तामधील खनिज संपत्तीवर अमेरिकेचा प्रभाव वाढवण्यासाठी मुनीर आणि शाहबाज त्यांची हुजेरीगिरी करत आहेत. या खाण -डीलमुळेच अमेरिका आणि पाकिस्तानमधील जवळीकता वाढत आहे.
Ans: सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डळमळली आहे. या गुंतवणूकीमुळे याला थोडा आधार मिळेल.






