बांगलादेशी विद्यार्थीनेता Sharif Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर संस्था आणि संघटनांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हादीच्या हत्येनंतर बांगलादेशाच एका आठवड्यातच एक धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. उस्मान हादीची खोटी ओळख पटवण्यात आली होती. त्याचे नाव उस्मान गोनी असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर उस्मानचा मृतदेह सिंगापूरहून बांगलादेशात आणण्यात आला त्यावेळी त्याच्या मृतदेह पेटवरही चुकीचे नाव नोंदवण्यात आले होते.
याशिवाय गोनी याने आपल्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात बनावट ओळख निर्माण केल्याचे नॉर्थ इस्ट न्यूजच्या तपासात आढळून आले आहे. उस्मान गोनी हा ढाका येथील विद्यापीठात राजकीय शास्त्र शाखेचा विद्यार्थी होता.यापूर्वी त्याने झालोकोठी येथील मदरशामधून शिक्षण घेतले होते. सध्या उस्मान हादीची हत्या केवळ हत्या नसून त्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर मोठी चर्चाही सुरु आहे.
नॉर्थ ईस्टच्या अहवालानुसार, हादीच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद उर्फ दाऊद खान याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसूूदहा २०२४ नोव्हेंबरमध्ये खंडणी व बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे दजोन पिस्तुल आणि गोळ्या सापडल्या होत्या. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने याला मंजुरी दिली होती. दावा केला जात आहे की, हा जामीन दाऊद खानला जमात-ए-इस्लीमाच्या आणि BNP पक्षाच्या वकीलांनी मिळवून दिला होता.
दरम्यान या प्रकरणी बांगलदेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) आणि गुप्तचर संस्था DGFI च्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मसूद ऊर्फ दाऊद खान याची ओळख देखील खोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अटकेचे फोटो बनावट होते, हादीची हत्या नियोजित होती असा दावा केला जात आहे. यामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बांगलादेशात हिंसाचार तीव्र उफाळला आहे.






