बांगलादेश हिंसाचारात पत्रकाराचा मृत्यू, एका पोलिसासह चार जण जखमी; भारताने जारी केली ऍडव्हायजरी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Bangladesh violence news today live updates : शेजारील देश बांगलादेश (Bangladesh) सध्या रक्तरंजित हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभा आहे. विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात अराजकता माजली असून, याचे पडसाद आता थेट भारतविरोधी निदर्शने आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या रूपात उमटत आहेत. गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी केवळ बांगलादेशच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील शांतता धोक्यात आली आहे.
हिंसाचाराची सर्वात भीषण घटना खुलना येथे घडली. शालुआ प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार इमदादुल हक मिलन हे एका चहाच्या टपरीवर बसले असताना, दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. मिलन यांचा जागीच मृत्यू झाला. एका पत्रकाराची अशा प्रकारे दिवसाढवळ्या झालेली हत्या बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ठरली आहे. या हल्ल्यात अन्य काही नागरिकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कट्टरपंथी संघटना ‘इन्कलाब मंच’च्या समर्थकांनी आपला मोर्चा आता थेट भारताकडे वळवला आहे. चितगाव येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाबाहेर मध्यरात्री जमावाने जोरदार निदर्शने केली. कार्यालयावर विटा फेकण्यात आल्या असून तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चितगाव दूतावासाबाहेर बांगलादेशी लष्कर (Army) तैनात करण्यात आले आहे. राजशाही येथील भारतीय कार्यालयालाही घेराव घालण्याचे आवाहन कट्टरपंथीयांनी दिले असून, शाहबाग परिसरात ‘भारतावर बहिष्कार टाका’ (Boycott India) अशा घोषणा दिल्या जात आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Snow : जगाचा अंत जवळ आलाय? सौदी अरेबियातील बर्फवृष्टीमुळे कालचक्र फिरलं अन् पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत
हिंसाचाराच्या या आगीत अल्पसंख्याक हिंदू समाजाला जाणीवपूर्वक भरडले जात आहे. मयमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची ‘ईशनिंदे’चा खोटा आरोप लावून जमावाने निर्घृण हत्या केली. हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या भावनांचा फायदा घेत कट्टरपंथी हिंदू कुटुंबांना लक्ष्य करत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण आहे.
Latest on the Bangladesh violence. I explain on @NDTV as two Newspaper buildings are set ablaze and one senior editor physically assaulted in Dhaka. The violence and mass protests likely to escalate today. Major challenge for Yunus Government. Radicals on rampage. pic.twitter.com/wnAtENk1hl — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 19, 2025
credit : social media and Twitter
सिंगापूरमध्ये उपचार घेत असताना निधन झालेले युवा नेते शरीफ उस्मान हादी यांचे पार्थिव आज संध्याकाळी बांगलादेशात पोहोचणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे विद्यार्थी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ढाका विद्यापीठातील ऐतिहासिक ‘शेख मुजीबुर रहमान हॉल’चे नाव बदलून विद्यार्थ्यांनी तिथे ‘शहीद उस्मान हादी हॉल’ असे पोस्टर्स लावले आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि निदर्शकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा
बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता, भारतीय उच्चायुक्तालयाने तात्काळ ॲडव्हायजरी जारी केली आहे. बांगलादेशात असलेल्या भारतीय पर्यटकांना, प्रवाशांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकन दूतावासानेही हादी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असला तरी, हिंसक मार्गाचा निषेध केला आहे.
Ans: खुलना येथील शालुआ प्रेस क्लबचे अध्यक्ष इमदादुल हक मिलन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Ans: बांगलादेशातील चितगाव (Chittagong) येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयावर जमावाने विटाफेक आणि तोडफोड केली आहे.
Ans: भारताने ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली असून, भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास आणि प्रवास मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे.






