बांग्लादेशच्या एअरफोर्स बेसवर हल्ला
बांग्लादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेश एअरफोर्सच्या बेसवर हल्ला झाला आहे. कॉक्स बाजार येथील बांग्लादेशच्या हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला आहे. ज्यात एक जण ठार झाला आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांग्लादेशमध्ये हिंसाचाराची समस्या वाढली आहे. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. काही अज्ञात लोकांनी बांग्लादेशच्या एअर फोर्सबेसवर हल्ला केला. ज्यात 1 जण ठार झाला आहे.
कॉक्स बाजारचे जिल्हा आयुक्त मोहम्मद सलाहउद्दीन यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. एअरफोर्स बेसवर एक जमावाने हल्ला केला. त्यानंतर त्या ठिकाणी सणघर्ष वाढला. दोन्ही पक्षांचे लोक आमनेसामने आली. या हिंसाचारात सापडलेल्या समिति पारा येथील 30 वर्षीय शीहार कबीरचा देखील समावेश होता. अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
बांग्लादेश एअरफोर्सने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवाई दल आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत आहेत. मात्र हा हल्ला अचानक झाला. त्यामगे नेमके काय कारण होते हे समोर आले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर एअरफोर्स बेसची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
बांगलादेशची उडाली झोप; अमेरिकेची हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोठी कारवाई
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरु झालेल्या विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिसांचार घडला. विशेषत: अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. या अत्याचाराला भारत, अमेरिकेने तीव्र विरोध केला. दरम्यान अमेरिकेने आता बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
झेलेन्स्कींचा अमेरिकेवरील विश्वास उडाला; रशिया पुढे झुकले डोनाल्ड ट्रम्प
न्यू हॅम्पशायर स्टेट असेंब्लीने या संदर्भात महत्त्वाचा प्रस्ताव जारी केला असून यानुसार अमेरिकन सरकारला बांगलादेशातील अंतरिम सरकारला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावात या अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हिंसाचार, धार्मिक स्थळांवरील हल्ले, हत्या, आणि मालमत्तेच्या विध्वंसाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेकडून बांगलादेशातील परिस्थितीवर इतक्या कठोर शब्दांत कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना मंजुर करण्यात आला. यामुळे भारताचाही या मुद्द्यावरचा दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रस्ताव रिपल्बिकन प्रतिनिधी अबुल बी खान यांनी सादर केला. त्यांच्या या प्रस्तावाला डग थॉमस आणि जोना व्हीलर यांनीही पाठिंबा दिला.