झेलेन्स्कींचा अमेरिकेवरील विश्वास उडाला; रशिया पुढे झुकले डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन व युरोपला युद्धातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सौदी अरेबियात चर्चा देखील झाली. मात्र, ट्रम्प यांची भूमिका कमकुवत होत चालली असल्याचे म्हटले जात आहे. कारण अरिकन प्रशासन आता थेट रशियाशी चर्चा करत आहेत. तसेच या चर्चेचा मुख्य उद्देश युक्रेन युद्ध थांबवणे बाजूला राहिला असून अमेरिका-रशिया संबंधांवर भर देण्यात येते आहे.
अमेरिका भूमिकेत कमकुवत?
दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या रियाध येथे झालेल्या रशियन व अमेरिकन अधिकाऱ्यांच्या चर्चेत अनेक प्रश्न समोर आले. युक्रेनटे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागारा पोडोल्याक यांनी दावा केला आहे की, अमेरिका आपल्या भूमिकेत कमकुवत पडत आहे आणि शांतता चर्चेपूर्वी रशियाला कूटनीतिक आघाडी दिली आहे.
ट्रम्प यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानानंतर पोडोल्याक यांनी प्रतिक्रिया दिली, यामध्ये ट्रम्प यांनी युद्धासाठी कीव जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता या युद्धाला पुठील आठवड्यात तीन वर्षी पूर्ण होती.
पोडोल्याक यांची प्रतिक्रिया
सौदी अरिबयाची राजधानी रियाध येथे अमेरिकन व रशियन अधिकाऱ्यांनी चर्चा केली, मात्र या चर्चेत युक्रेनचा नव्हे तर युरोपियन युनियनचा देखील सहभाग नव्हता. यामुळे पोडोल्याक यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशाला निर्णय प्रक्रिया सोपवायची म्हणजे काय?” त्यांना पूर्वी झालेल्या कोणत्याही चर्चेची माहिती देण्यात आलेली नाही. पोडोल्याक यांनी असेही म्हटले की, अमेरिकेच्या ‘ताकदीच्या माध्यमातून शांतता’ या संकल्पनेत खूप कमकुवतपणा आहे.
युक्रेनमध्ये निवडणुकांची मागणी
याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, झेलेन्स्की हे निवडणुकांशिवाय सत्तेत असल्यामुळे त्यांना निवडणुकीला सामोरे जायला हवे. मात्र, कीव प्रशासनाने सांगितले की युद्धाच्या काळात निवडणुका घेणे संविधानाच्या विरोधात आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही झेलेन्स्की यांच्यावर टीका करत त्यांना ‘तानाशाह’ म्हटले.
युक्रेनचा अमेरिकेवरील विश्वास उडाला
मात्र, पोडोल्याक यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियावर तीव्र नाराज असून युक्रेनच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा रशिया प्रयत्न करेल असा दावाही पोडोल्याक यांनी केला आहे. युक्रेनच्या भूमिकेला डावलून चाललेल्या या घडामोडींनी युक्रेनची चिंता वाढवली आहे, आणि आता युक्रेनला शांतता प्रक्रियेबाबत अमेरिकेवर फारसे विश्वास राहिलेला दिसत नाही.