बांगलादेशने भारताला पुन्हा सुनावले: शेख हसीनांबाबत दिला हा इशारा (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या समर्थकांनी 6 फेब्रुवारी रोजी निदर्शने काढण्याचा निर्णय घेतला होता. या निदर्शनांमध्ये शेख हसीनांवरील आरोप आणि खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात येणार होती. मात्र, निदर्शनाच्या एक दिवस आधी शेख हसीना त्यांच्या समर्थकांना ऑनलाइन भाषण देण्यापूर्वी देशात पुन्हा हिंसाचार उफाळला. शेख हसीना यांच्या विरोधकांनी बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर्रहमान उर्फ ‘बंगबंधू’ यांच्या ढाका येथील धनमंडी-32 घरावर हल्ला करत तोडफोड केली आणि आग लावली आहे.
यामुळे शेख हसीना यांनी संतप्त होऊन दिल्ली असताना युनूस सरकारवर तीव्र टिका केली. शेख हसीना आणि अवामी लीगच्या पक्षाने अंतरिम सरकारवर बंगबंधूंच्या निवासस्थानाचा पाडाव थांबवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप केला. तसेच शेख हसीना यांनी अंतरिम सरकारने चुकीच्या पद्धतीन सत्ता हस्तगत केल्याचा देखील आरोप केला. हसीना यांचे हे आरोप बांगलादेशने अमान्य करत ढाका ने हसीना यांनी, खोट्या आणि बनावट वक्तव्य केल्याचा आरोप केला आणि भारताने योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली.
Our response to media queries on summoning of Bangladesh Acting High Commissioner⬇️
🔗 https://t.co/eh4zuTTdJ4 pic.twitter.com/X7URdc3bIq
— Randhir Jaiswal (@MEAIndia) February 7, 2025
भारताचे प्रत्युत्तर
यामुळे भारताने संतप्त होत परराष्ट्र मंत्रालयाद्वारे, शेख मुजीबूर यांचे घर जाळल्याचा तीव्र निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी रहमानच्या घराच्या विध्वंसाचा निषेध केला आणि याला “क्रूरतेचे कृत्य” म्हटले. तसेच शेख हसीना यांचे वक्तव्य त्यांच्या वैयक्तिक असून यामध्ये भारताचा कोणताही समावेश नसल्याचे रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्यांनी बांगलादेशला शेख हसीना यांच्या भारतातील वक्तव्यांना नवी दिल्लीच्या भूमिकेशी जोडून वातावरण बिघडवणे आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल नकारात्मकता निर्माण करणे थांबवावे असे सांगितले.
यासाठी बांगलादेश स्वत:हा जबाबदार
रणधीर जयस्वाल यांनी असेही स्पष्ट केले की, भारत सरकारने बांगलादेशसोबत अनेक सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. बांगलादेशच नकारात्मक भूमिकेसाठी जबाबदार आहेत. यामुळे बांगलादेशने संबंध बिघडवल्यावर अशाच पद्धतीने आमच्याकडून प्रतिसाद मिळेल हेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरक्षणविरोधी आंदोलनातून सत्ता उलथवली
5 जून 2024 रोजी बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण लागू केले. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. सरकारने हे आरक्षण रद्द करताच विद्यार्थ्यांनी हसीनांच्या राजीनाम्याची मागणी केली. 5 ऑगस्ट 2024 रोजी हसीनांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. काल झालेल्या हिंसक आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली.