वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफ धोरणाची (करवाढीची) अंमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील जनता, राजकीय नेते, नागरी हक्क गट, कामगार संघटना आणि व्यावसायिक समुदाय या धोरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. 50 हून अधिक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत आणि ‘ट्रम्प-मस्क गो बॅक’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.
शुल्क वाढीमुळे अमेरिकन नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडणार असून, याचा थेट फटका मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना बसणार आहे. या नव्या धोरणामुळे वस्तूंच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेतील आंदोलनामुळे भारतीय बाजारपेठेला मोठा फटका; 10 सेकंदात 20 लाख कोटींचे नुकसान
1200 हून अधिक ठिकाणी आंदोलन, लाखो लोक रस्त्यावर
शनिवारी 1200 हून अधिक ठिकाणी ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. लाखो अमेरिकन नागरिक ‘हँड्स ऑफ’ या निदर्शनात सहभागी झाले. वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल मॉल, न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन, तसेच बोस्टनमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. नागरिकांनी ‘फाइट द ऑलिगार्की’ (सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढा) अशा घोषणा दिल्या. रविवारी हे आंदोलन आणखी तीव्र झाले. देशभरात 1400 हून अधिक मोर्चे काढण्यात आले, ज्याला ‘हँड्स-ऑन’ असे नाव देण्यात आले. या आंदोलनासाठी सहा लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती, जे ट्रम्प यांच्या विरोधातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक ठरले.
नागरिकांचे अनोखे आंदोलन, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा अवतार आणि तोंडाला पट्ट्या
ट्रम्प यांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांविरोधात संतप्त झालेल्या लोकांनी एक अनोखी प्रतिकात्मक पद्धत स्वीकारली. निदर्शन करणारे अनेक जण न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या अवतारात दिसले. काही आंदोलकांनी तोंडाला पट्टी बांधून शांततामय निषेध नोंदवला. LGBTQ समुदाय, महिला हक्क गट, नागरी हक्क संघटना आणि कामगार संघटनांनीही या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक आंदोलकांनी असे म्हटले की, ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, आणि त्यांचा सरकारवरचा विश्वास उडत आहे.
Anti-Trump Protests in Cities Across US Declare ‘Hands Off’
Thousands protested Trump nationwide Saturday against Musk, budget cuts, tariffs; in favor of democracy, immigrants, empathy pic.twitter.com/MLhTMLmM3P
— Roy Rogue (@rogue185263) April 6, 2025
credit : social media
टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेचे होणारे नुकसान
ट्रम्प यांच्या शुल्क वाढीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गंभीर फटका बसणार आहे, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. हे नवीन टॅरिफ म्हणजे इतर देशांनी अमेरिकेत वस्तू विकताना सरकारला जादा कर भरावा लागेल, परिणामी आयात केलेला माल अधिक महाग होईल. या धोरणामुळे अमेरिकन मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडणार आहे. अमेरिकन लोकांचा मोठा भाग परदेशी उत्पादित वस्तूंवर अवलंबून आहे, जसे की –
खाद्यपदार्थ
वाहने
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे
औषधे आणि वैद्यकीय साधने
कपडे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू
जर ट्रम्प यांनी शुल्क वाढीचा निर्णय मागे घेतला नाही, तर महागाईत मोठी वाढ होईल आणि सामान्य जनतेला याचा जबरदस्त आर्थिक फटका बसेल.
ब्लॅक लाइव्ह्स मॅटरनंतरचे सर्वात मोठे आंदोलन
2020 मध्ये झालेल्या ब्लॅक लाइव्ह्स मॅटर (Black Lives Matter) आंदोलनानंतर हे अमेरिकेतील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अमेरिकेतील सामान्य जनता स्वतःच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण हे अमेरिकेच्या हितासाठी नाही, तर रशियाच्या फायद्यासाठी आहे. काही आंदोलकांनी असा आरोप केला की, ट्रम्प हे अमेरिकेच्या मध्यमवर्गीय जनतेपेक्षा श्रीमंत व्यावसायिक आणि बाहेरील मोठ्या हितसंबंधांसाठी काम करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा हेरगिरीचा नवा डाव; ब्रिटनच्या अणु प्रकल्पाजवळ सापडला पाण्याखालील स्पाय कॅमेरा
ट्रम्प यांच्या विरोधातील असंतोष उफाळला
ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरोधात अमेरिकेत प्रचंड संताप आहे. नव्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे, आणि त्यामुळे देशभर मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि आंदोलने सुरू झाली आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि आर्थिक संकट टाळण्यासाठी अमेरिकन जनता ट्रम्प प्रशासनाला मागे हटवण्याच्या तयारीत दिसत आहे. हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, ट्रम्प प्रशासनावर याचा मोठा राजकीय आणि आर्थिक दबाव येऊ शकतो.